मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक पुरस्कार २०२६ घोषणा केली आहे. हा भव्य पुरस्कार सोहळा १५ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. हे पुरस्कार बोर्ड दरवर्षी विविध श्रेणींमध्ये खेळाडू, माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांना प्रदान करते. यावर्षी कुणाला कोणता पुरस्कार मिळेल ते जाहीर झाले आहे.
यांना मिळणार जीवनगौरव
1983 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचे सदस्य आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सीके नायुडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज हिला देखील जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
North Korea: इराण-अमेरिका युद्धात आता उत्तर कोरियाची एन्ट्री; एकापाठोपाठ १० क्षेपणास्त्र डागले
हे खेळाडू पुरस्काराने होणार सन्मानित
बीसीसीआयने जाहीर केले आहे की भारतीय कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला पुरुषांसाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्कार प्रदान केला जाईल. गिलला हा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा मिळणार आहे. स्मृती मानधनाला महिलांसाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कार प्रदान केला जाईल, जो तिच्या कारकिर्दीतील पाचवा सन्मान आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये इरा जाधव हिला जगमोहन दलमिया ट्रॉफी देण्यात येणार आहे, जी देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला दिली जाते. तसेच शेफाली वर्मा हिला सीनियर महिला घरेलू वनडे स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू म्हणून हीच ट्रॉफी प्रदान केली जाईल.
रुष घरेलू क्रिकेटमध्ये आयुष म्हात्रे (मुंबई) याला लिमिटेड ओव्हर्स स्पर्धेत सर्वोत्तम ऑलराउंडर म्हणून लाला अमरनाथ पुरस्कार दिला जाईल. तर हर्ष दुबे (विदर्भ) याला रणजी ट्रॉफीतील सर्वोत्तम ऑलराउंडर म्हणून हाच पुरस्कार मिळणार आहे. याशिवाय, मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुन्हा एकदा BCCI घरेलू स्पर्धांमधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार मिळणार आहे. कारण या हंगामात मुंबईने चार ट्रॉफी जिंकल्या आणि दोन स्पर्धांत उपविजेतेपद मिळवले.
पाच आयसीसी विजेते भारतीय संघ गौरवले जाणार
यंदाच्या नमन अवॉर्ड्स सोहळ्यात आणखी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. एकाच मंचावर पाच आयसीसी विजेते भारतीय संघ गौरवले जाणार आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विजेत्या संघांचा एकत्र सन्मान होणार आहे.





