नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यामध्ये मागील १५ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या झळा जगभरात बसत असतानाच किम जोंग उन यांच्या उत्तर कोरियाकडून मोठी लष्करी हालचाल करण्यात आली आहे. उत्तर कोरियाने शनिवारी संशयास्पद बॅलिस्टिक प्रक्षेपणास्त्र डागले.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने आणि जपान सरकारने १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याची पुष्टी केली. उत्तर कोरियाने यापूर्वी २७ जानेवारी रोजी पूर्व समुद्राच्या दिशेने अनेक कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा डागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाकडून नव्या बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी घेण्यात आली. किम जोंग यांच्या या निर्णयामुळे जपानमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
Sonam Wangchuk: मोठी बातमी! सोनम वांगचुक यांची १७० दिवसांनी होणार सुटका; केंद्र सरकारने NSA हटवला
दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने सांगितले की त्यांना दुपारी १:२० वाजता उत्तर कोरियाच्या सुनान भागातून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र आढळले. या वर्षी उत्तर कोरियाने सोडलेले हे तिसरे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र होते.
उत्तर कोरियाने पूर्वे समुद्रकिनाऱ्यावरुन अज्ञात वस्तू प्रक्षेपित ( संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी) केल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे. जपान या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाने सोडलेली क्षेपणास्त्रे समुद्रात पडल्याची माहिती जपानकडून देण्यात आली आहे. सध्या दक्षिण कोरियन लष्कराच्या वार्षिक सैन्य कवायती (फ्रीडम शिल्ड) सुरु आहेत.
जेसीएसने म्हटले आहे की, “आमचे सैन्य पूर्णपणे सज्ज आहे आणि उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांशी संबंधित माहिती अमेरिका आणि जपानसोबत शेअर करत आहे. आम्ही कोणत्याही अतिरिक्त क्षेपणास्त्रांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
जपान सरकार या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाने डागलेली वस्तू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असू शकते. उत्तर कोरियाने डागलेली संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आधीच समुद्रात पडली आहेत, जपानी तटरक्षक दलाने सांगितले आहे.
उत्तर कोरियाने शनिवारी अचानक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी का केली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्रचंड मोठी लष्करी ताकद, आधुनिक युद्धसामुग्री आणि अणवस्त्रधारी असलेला उत्तर कोरिया या सगळ्या संघर्षात उतरल्यास हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील सर्व देश उत्तर कोरियाच्या हालचालींकडे लक्ष ठेऊन आहेत.





