Monday, July 1, 2024
Homeनंदुरबारसरपंच, उपसरपंचांची गटविकास अधिकार्‍यांशी हुज्जत

सरपंच, उपसरपंचांची गटविकास अधिकार्‍यांशी हुज्जत

वाण्याविहिर| वार्ताहर – AKKALKUWA

- Advertisement -

अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीचा कार्यभार ग्रामसेवक आर.आर.वळवी यांच्याकडे दिल्यामुळे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी धमकी देवून विविध आरोप केल्यामुळे पंचायत समितीत कार्यरत असेपर्यंत गटविकास अधिकार्‍यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.

अक्कलकुवा गृपग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भात काही महिन्यांपासून विविध प्रकारचे आरोप व प्रत्यारोप होत आहेत. नव्याने आलेले प्रभारी गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी ग्रामसेवक आर.आर.वळवी यांच्याकडे सदर ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपवण्याचे आदेश दिले.

मात्र, सरपंच व उपसरपंच व सदस्यांनी गटविकास अधिकार्‍यांशी हुज्जत घातल्याने स्वरक्षणासाठी गटविकास अधिकार्‍यांनी पोलिस संरक्षण मागविले आहे.

अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायत संदर्भात प्रभारी गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी माहिती सविस्तरपणे जाणून घेतली.

याठिकाणी नेमणूक असलेल्या महिला ग्रामसेविका यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला असता कार्यभार जास्त होत असल्याने त्यांच्याजागी ग्रामसेवक आर.आर.वळवी यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला.

ग्रामपंचायतीकडून त्यांना पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने अक्कलकुवा पंचायत समितीला तशी माहिती कळवण्यात आली. या संदर्भात गट विकास अधिकार्‍यांनी अक्कलकुवा ग्रामपंचायतीला वेळोवेळी नोटीसा बजावल्या आहेत.

त्यामुळे ग्राम पंचायतचे सरपंच, उपसरपंच, इतर सदस्यांना राग आल्याने अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकार्‍यांच्या दालनात घुसून त्यांच्याशी हुज्जत घालण्यात आली. त्यामुळे गटविकास अधिकार्‍यांनी संबधित घटना पोलीस ठाण्यात कळवली.

तत्त्काळ पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. जिवाला धोका होवू नये यासाठी श्री.सूर्यवंशी यांनी पोलिस अधीक्षक व अक्कलकुवा पोलिस निरीक्षक यांच्याकडे यांच्याकडे स्वसंरक्षण करिता पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेवून गटविकास अधिकार्‍यांनी माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या