Saturday, April 26, 2025
Homeनाशिकवृद्ध जोडप्यास मारहाण; रोख रकमेसह दागिने केले लंपास

वृद्ध जोडप्यास मारहाण; रोख रकमेसह दागिने केले लंपास

सिन्नर । वार्ताहर Sinnar

- Advertisement -

तालुक्यातील शहा येथे अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी घरात शिरून वृद्ध दांपत्याला मारहाण करत हजारोंची रोकड व दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि. 8) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहा-पाथरे रस्त्यालगत वसंत यशवंत जाधव (75) व त्यांची पत्नी बबुबाई हे वृद्ध दांपत्य राहते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जाधव व त्यांच्या पत्नी घरात झोपलेले असताना तीन ते चार चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवल्याने जाधव यांना जाग आली. जाधव यांनी दरवाजा उघडला असता चोरट्यांनी त्यांना सोबत आणलेल्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या कुर्‍हाडीचा धाक दाखवून घरातील रोकड व मौल्यवान वस्तू काढून देण्यास सांगितले.

जाधव यांच्या पत्नी बबुबाई याही जाग्या झाल्यानंतर त्यांनाही चोरट्यांनी धमकावत त्यांच्या अंगावर असलेली एक तोळ्याची सोन्याची पोत, पाच ग्रॅमचे सोन्याचे डोरले, पाच ग्रॅमचे कानातील कर्णफुले काढून घेतले. तसेच जाधव यांच्या खिशात असलेली आठ हजारांची रोकडही चोरट्यांनी काढून घेत तेथून पळ काढला.

त्यानंतर जाधव दाम्पत्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. दुसर्‍या दिवशी सकाळी वावी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक एस. ए. पवार, उपनिरीक्षक आहेर, पी. के. वाघमारे यांच्यासह सेवकांनी घटनास्थळी धाव घेतली.

पंचनामा करुन पोलिसांनी जाधव यांच्या फिर्यादीवरून तीन ते चार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक आहेर करत आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीच्या वेळी गाव व परिसरात गस्त घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिक करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...