Thursday, April 30, 2026
HomeनाशिकNashik News : 'स्ट्राँगरूम' भोवती सशस्त्र कवच; मतदान-मतमोजणीदरम्यान त्रिस्तरीय सुरक्षा

Nashik News : ‘स्ट्राँगरूम’ भोवती सशस्त्र कवच; मतदान-मतमोजणीदरम्यान त्रिस्तरीय सुरक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवये सात दिवस शिल्लक राहिल्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने (Nashik City Commissioner Office) निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांवरील ‘स्ट्राँगरूम’ बाहेर सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. मतदान (Voting) साहित्याचे वितरण, प्रक्रिया आणि मतमोजणी पूर्ण होईपर्यंत ही सुरक्षा कायम राहणार असून, पुढील आदेशापर्यंत बंदोबस्त कायम ठेवण्याचे निर्देश पोलीस उपायुक्तांनी दिले आहेत.

- Advertisement -

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Nashik NMC) १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नऊ ठिकाणी ‘स्ट्राँगरूम’ उभारण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, विशेष शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे, परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत आणि परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे यांच्या पथकांकडून संबंधित हद्दीतील ‘स्ट्राँगरूम’ परिसरात गस्त सुरू आहे. वाहतूक नियोजनाची जबाबदारी सहायक आयुक्त अद्विता शिदे यांच्या पथकांकडे सोपविण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे.

प्रत्येक ‘स्ट्राँगरूम’ साठी सहायक आयुक्त दर्जाचा समन्वय अधिकारी नेमण्यात येणार आहे. सध्या पोलीस ठाणेनिहाय सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, १४ जानेवारीपासून दोनस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली जाणार आहे. तर १५ जानेवारी रोजी सायंकाळपासून सर्व ‘स्ट्रॉगरूम ‘बाहेर तीनस्तरीय सुरक्षा कवच राहणार आहे. यात स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, गोपनीय विभाग तसेच गुन्हे शाखेचा अतिरिक्त बंदोबस्त सहभागी असेल. विशेष हणज उमेदवारांचे कार्यकर्ते, राजकीय पदाधिकार्‍यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात असतील.

वाहतूक मार्गामध्ये बदल

निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान साहित्याचे वितरण व जमा प्रक्रिया संबंधित ‘स्ट्रॉगरूम’मधूनच पार पडणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होणार असून, सशस्त्र बंदोबस्तात साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचले जाणार आहे. १४ जानेवारी रोजी सायंकाळी उशिरापर्यंत साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरू राहील. तर १५ जानेवारी रोजी मतदानानंतर साहित्य पुन्हा ‘स्ट्रॉगरूम’मध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित ‘स्ट्राँगरूम कडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात येणार असून, याबाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे.

‘स्ट्रॉगरूम’ व मतमोजणीची ठिकाणे

दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, प्रबोधनकार ठाकरे सभागृह, अंबड, अटल दिव्यांग भवन, मुंबई नाका, सातपूर क्लब हाऊस, सातपूर छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम, अंबड, शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव रोड, नाशिकरोड विभागीय कार्यालय.

ताज्या बातम्या

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली

0
​नाशिक | प्रतिनिधी Nashik राज्य गृह विभागाने गुरुवारी (दि. ३०) भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या...