Monday, June 24, 2024
Homeनगरछिंदम बंधूंसह चौघांचा गुन्ह्यातून वगळण्याचा अर्ज नामंजूर

छिंदम बंधूंसह चौघांचा गुन्ह्यातून वगळण्याचा अर्ज नामंजूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

दिल्लीगेट वेशी समोरील मोक्याची जागा ताब्यात घेण्यासाठी ज्यूस सेंटर मालकाला जातीवाचक शिविगाळ, मारहाण करून बळजबरीने टपरी हटविल्याप्रकरणात श्रीकांत आणि श्रीपाद छिंदम सह चौघांची नावे गुन्ह्यातून वगळण्याची विनंती न्यायालयाने नामंजूर केली आहे. या प्रकरणात दोषारोप पत्र दाखल करून आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी दिले आहेत.

छिंदम बंधू सह इतरांनी सदरचा गुन्हा घडलाच नसून आम्हाला या गुन्ह्यातून वगळण्यात यावे असा अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने निकाली काढला आहे. यामुळे छिंदम बंधूसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे विरूध्द अ‍ॅट्रॉसिटी कलमांतर्गत दाखल गुन्ह्याचा खटला सुरूच रहाणार आहे. हा गुन्हा किंवा असा प्रकार प्रत्यक्ष घटनास्थळी घडलाच नाही, या घटनेबाबत आमच्याविरूध्द काही पुरावा सापडलेला नाही, तपास करणार्‍या आणि प्रत्यक्ष घटनास्थळी हजर असणार्‍या पोलिसांनी देखील तसाच जबाब दिला आहे, असा युक्तिवाद छिंदम याच्या वकिलांनी न्यालयासमोर केला होता.

छिंदम बंधूंनी नगरच्या दिल्लीगेट येथील मोक्याची सी टी सर्व्हे नंबर 7395/बी/3 ही मिळकत दिनांक 14 मे 2021 रोजी खरेदी केली होती. त्यानंतर दोनच महिन्यांनी ही जागा ताब्यात घेण्याची बेकायदेशीर कारवाई केली होती. यात भगीरथ भानुदास बोडखे यांच्या मालकीची जूस सेंटर ची टपरी होती. ती जेसीबी च्या सहाय्याने हटविण्याची कारवाई करण्यात येत असताना बोडखे यांना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. या घटनेवेळी छिंदम आणि त्याचे साथीदार घटनास्थळी उपस्थित असल्याचे व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या