Sunday, June 30, 2024
Homeक्राईममारहाणीतील झटापटीतून तरूणीच्या तोंडात गेले फिनाईल

मारहाणीतील झटापटीतून तरूणीच्या तोंडात गेले फिनाईल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

मारहाणीतील झटापटीत तरुणीच्या तोंडात फिनाईल गेल्याने तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चैताली राजेश बुर्‍हाडे (रा. गोंधळे गल्ली, माळीवाडा) असे जखमी तरुणीचे नाव आहे. त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या एमएलसी जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द सोमवारी (24 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदेश झेंडे (रा. कायनेटीक चौक, नगर), हर्षदा कदम, अर्चना कदम, उत्कर्षा कदम (सर्व रा. स्टेशन रस्ता, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी तरुणी 21 जून रोजी रात्री 12 वाजता त्यांच्या घरी गोंधळे गल्ली येथे कुटुंबासह असताना आदेश झेंडे याच्यासह चौघे तेथे आले. त्यांनी फिर्यादी तरुणी, त्यांची आई, बहिण, आजी यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करणार्‍यांनी घरातून निघून जावे म्हणून फिर्यादी तरुणीने फिनाईलची बाटली हातात घेतली व पिण्याची धमकी दिली.

त्यावेळी मारहाण करणार्‍यांशी झालेल्या झटापटीत बाटलीतील फिनाईल फिर्यादी तरुणीच्या तोंडात गेले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या एमएलसी जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कपिले करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या