Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजखोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ४ महिला...

खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ४ महिला जखमी

बीड | Beed
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात खोक्या भोसले यांच्या कुटुंबातील चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यातील एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

ही धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये घडली. मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास १० ते १५ जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. टोळक्याच्या हातात दांडके, कोयते, कुऱ्हाडी होत्या आणि त्यांनी कुटुंबातील महिलांवर अमानुष हल्ला चढवला.

- Advertisement -

या हल्ल्यात जखमी महिला कशाबशा शिरूर पोलीस ठाण्यात पोहोचल्या आणि त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने दखल घेत जखमी महिलांना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका महिलाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे.

YouTube video player

प्राथमिक माहितीनुसार, अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता? असे म्हणत टोळक्याने सतीश भोसलेच्या कुटुंबाला जबर मारहाण केल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

कोण आहे सतीश भोसले उर्फ खोक्या
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे आणि त्याची ओळख भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी म्हणून आहे. सतीश भोसलेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...