Saturday, September 21, 2024
Homeनंदुरबाररंगावली नदीच्या पात्रातील मातीचा भराव काढण्यास सुरुवात

रंगावली नदीच्या पात्रातील मातीचा भराव काढण्यास सुरुवात

नवापूर Navapur। श.प्र.

- Advertisement -

दैनिक देशदूतमध्ये वृत्त प्रकाशित होताच रंगावली नदीच्या (Rangavali river basin) पात्रात टाकण्यात आलेला मातीचा भराव (Soil filling) काढण्यात (Was removed) आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

नवापूर शहरालगत नॅशनल हायवे क्रमांक 6 चे काम प्रगतीपथावर सुरु आहे. नवापूर शहरातील देवळफळी भागाकडे रंगावली नदीवर पूल बांधण्याचे काम सुरु आहे. या नँशनल हायवेचे काम म्हात्रे कंपनीने हाती घेतले आहे. मात्र या पुलाचे काम सुरु असताना बारमाही वाहणारी नवापूरची जिवनदायीनी रंगावली नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करुन दिल्यामुळे नदीचे पात्र बंद झाले होते.

रंगावली नदीला गेल्या काही वर्षापासुन पावसाळ्यात मोठा पूर येत आहे.पुलाच्या कामातील भरावामुळे रंगावली नदीचे पाणी रंगावली नदी किनारी राहणार्‍या लोकवस्तीत जाऊन प्रचंड प्रमाणात नुकसान होणाची दाट शक्यता आहे. पुल बांधत असतांना त्या कामातील माती व जवळच असलेल्या टेकड्यावरील माती रंगावली नदीत जाऊन नदीपात्र बुजले आहे. यामुळे नवापूर प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

या पुलाचे बांधकाम सुरु आहे. तर काही अंतरावर नवापूर शहराला पाणी पुरवठा करणारा के.टी. वेअर बंधारा आहे. त्यामुळे मातीच्या भरावामुळे बंधारा फुटण्याची दाट शक्यता होती. याबाबत दि.21 जून 2022 रोजी दैनिक देशदूत मध्ये ‘ महामार्गाच्या कामामुळे रंगावलीचे पात्र बुजले, पुराचे पाणी लोकवस्तीत शिरुन धोका निर्माण होण्याची शक्यता!’ या मथळयाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

या वृत्ताची दखल घेत तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी नॅशनल हायवेचे काम घेतलेल्या म्हात्रे कंपनीच्या अधिकार्‍यांना बोलावून मातीचा ढिगारा काढण्याचे आदेश दिले.त्यानुसार आज दि.21 जुन पासून मातीचा ढिगारा काढण्याचे काम जोमात सुरु केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून देशदूतचे आभार मानले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या