Friday, May 3, 2024
Homeनाशिकनांदगाव : लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

नांदगाव : लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

नांदगाव | Nandgoan

मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र व राज्य सरकारने विविध प्रकारच्या योजना अंमलात आणल्या आहेत.

- Advertisement -

येथील भारतीय स्टेट बँकेतील गेल्या दोन वर्षीपासून मागासवर्गीय महामंडळाकडून मंजूर झालेलेे कर्ज प्रकरणे संबंधित अधिकारी देण्यास टाळाटाळ करीत असून आणि वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार करून देखील अधिकारी दुर्लक्ष करतात.

मागासवर्गीय समाजाची एकही प्रकरण मार्गी लागत नसल्याने व बँकेच्या मनमानी कारभारा विरोधात जुन्या तहसील कार्यालया प्रवेशद्वाराजवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)वतीने आमरण उपोषण करण्यात आले.

यावेळी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

गेल्या दोन वर्षीपासून मागासवर्गीय महामंडळातर्फे बिजभांडवल योजनेअंतर्गत लाभार्थी विविध प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी मंजूर कर्ज प्रकरणे संबंधित बँक अधिकारी देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे आमरण उपोषण आज सकाळी जुन्या तहसील कार्यालयजवळ करण्यात आले होते.

तहसीलदार उदय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संतोष मटकुळे, बँकेचे फिल्ड -ऑफिसर खेडेकर यांच्या बरोबर उपोषणस्थळीं चर्चा करुन मागासवर्गीयांचे प्रलंबित प्रकरण एक महिन्याच्या आत सोडवले जातील, असे लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या