Sunday, January 25, 2026
HomeनगरShrirampur : बेलापुरात लाखोंचा गुटखा पकडला

Shrirampur : बेलापुरात लाखोंचा गुटखा पकडला

‘एसपीं’च्या आदेशाने तालुका पोलिसांनी टाकला छापा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील बेलापूर गावात काल सायंकाळी लाखो रुपयांचा गुटखा पोलीस पथकाने पकडला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. विशेष म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशाने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तालुका पोलिसांनी हा छापा टाकला.

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशान्वे जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे काम सुरु आहे. काल मंगळवारी सायंकाळी बेलापूर परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या गुटख्याचा साठा होणार असल्याची गुप्त बातमी जिल्हा पोलीस अधिक्षकांना मिळाली होती. त्या बातमीच्या आधारे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांना सदर ठिकाणी जावून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी बेलापूर परिसरातील ‘त्या’ पेट्रोल पंपा शेजारील जागेत जावून पहाणी केली असता लाखो रुपयांचा गुटखा त्यांना मिळून आला. याप्रकरणी बेलापूर आऊट पोस्टच्या पोलिसांना माहीती देण्यात आल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी दाखल होऊन गुटखा ताब्यात घेतला. या घटनेसंबंधी अन्न व औषध प्रशासनास माहीती देण्यात आली होती.

YouTube video player

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील उक्कलगाव परिसरात अशाच प्रकारे गुटखा विक्रीवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीही लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. स्थानिक पोलिस व स्थानिक गुन्हा शाखेच्या आशीर्वादाने हा गुटका व्यावसाय गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. फक्त श्रीरामपूर नव्हे तर संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासा सह अनेक ठिकाणी याठिकाणाहून गुटका पुरविला जातो. जिल्ह्यातील गुन्हेगारीची सखोल माहिती असलेले सोमनाथ घार्गे यांनी पोलिस अधिक्षकपदाचा पदभार घेताच या अवैध धंद्यांवर कारवाईचा धडका सुरु केला आहे.

या गुटखा व्यावसायिकाने या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता मिळविली असून एक पेट्रोल पंपही विकत घेतला आहे. अवैध मार्गाने कमविलेली मालमत्ता सील करण्याचा किंवा ती ताब्यात घेण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. त्यामुळे या कारवाईत पोलिस किती कठोर कारवाई करतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : घुमल्या घोषणा, दाटली गर्दी; नाशिकमधून ‘लाल वादळ’ मुंबईच्या...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati शेतकरी (Farmer) आणि कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पायी निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा (Kisaan Sabha)...