Friday, May 3, 2024
Homeनगरघरकुलासाठी लाभार्थ्यांना शासकीय दरात मिळणार वाळू

घरकुलासाठी लाभार्थ्यांना शासकीय दरात मिळणार वाळू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

2016-17 ते 2020-21 पर्यंतचे सर्व घरकुले महाआवास अभियानांतर्गत 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

या अभियानात ज्या ग्रामपंचायत, तालुका, जिल्ह्यात सर्वात जास्त घरकुले पुर्ण करतील, अशा सर्वांचा राज्य विभाग व जिल्हास्तरावर गुणांकनानुसार निवड करुन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच घरकुल बांधकामासाठी लाभार्थी यांना शासकीय दारात पाच ब्रासच्या मर्यादेत वाळू उपलब्ध करून देण्यात आहे.

पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महाआवास अभियान, ग्रामीण अभियानाची कार्यशाळा व्हिडीओ कॉन्फरंसव्दारे पार पडली. यावेळी मुंबईहून राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक, जिल्हा पातळीवरून जिल्हा परिषद अध्यक्षा ना. राजश्रीताई घुले पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रकल्प संचालक सुनिलकमार पठारे, तालुकास्तरावरुन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मिराताई शेटे, पंचायात समितीचे सभापती, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

केंद्र व राज्य पुरस्कत घरकुल योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेबु्रवारी 2021 या कालावधीमध्ये महाआवास अभियान-ग्रामीण राबविण्यात येणार आहे. या अभियानात भूमीहीन लाभाथींना जागा उपलब्ध करुन देणे, जिल्ह्यासाठी प्राप्त घरकुलांच्या उद्दिष्टानूसार 100 टक्के लाभार्थींना मंजुरी देणे, मंजुर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे 100 टक्के अनुदान वितरण करणे, प्रलंबित घरकुले पुर्ण करणे, ग्रामीण भागात गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, 14 तालुक्यांच्या पंचायत समितीच्या आवारात डेमो हाऊसेस बांधणे, शासकिय योजनांशी कृती संगम व नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करणे यांचा समावेश राहणार आहे.

जिल्ह्यासाठी 2020-21 या वर्षासाठी 18 हजार 351 घरकुलांचे उद्दोष्ट प्राप्त झालेले आहे. या घरकुलाचे उद्दिष्ट अभियान काळात मंजूरी देऊन पुर्ण करण्यात येणार आहे. तसेच 2016-17 ते 2020-21 पर्यंतचे सर्व घरकुले अभियानांतर्गत 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पुर्ण करावयाची आहेत.

या अभियानात ज्या ग्रामपंचायत, तालुका, जिल्ह्यात सर्वात जास्त घरे पुर्ण करतील अशा ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा यांचा राज्य विभाग व जिल्हास्तरावर गुणांकनानुसार निवड करुन सन्मान करण्यात येणार आहेत. भूमीहीन लाभार्थींना पंडीत दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 50 हजारपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

तसेच राज्य सरकारच्या गावठाण जागेवरील 500 स्केअर फुटपर्यंतची पात्र लाभार्थ्यांची अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत. घरकुल बांधकामासाठी पाच ब्रासच्या मर्यादेत वाळू पात्र लाभार्थ्यांना शासकीय दारात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

यासाठी गटविकास अधिकारी यांनी संबंधित तहसीलदार यांच्याकडे मागणी नोंदवयाची आहे. यावेळी केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना गुणवत्तापुर्वक व विहीत कालावधीत पुर्ण करण्यासाठी लाभार्थींना योग्य ती मदत केली जाईल, असे आश्‍वासन जिल्हा परिषद अध्यक्षा ना. घुले पाटील दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या