Friday, May 3, 2024
HomeUncategorizedबेसनचे लाडू

बेसनचे लाडू

साहित्य

१/२ किलो चणा डाळीचे जाडसर पीठ१ वाटी वनस्पती तूपदीड वाटी साखर५-६ वेलच्याथोडं जायफळ२ चमचे चारोळी१५-२० बेदाणेवेळ: १ ते २ तास

- Advertisement -

कृती

सर्व प्रथम कढईत तूप तापवा.तूप तापल्यावर डाळीचे पीठ घालून सतत परतत राहा. परतताना चमच्याने पीठ दाबून पिठाच्या गुठया मोडत राहाव्यात.

मंद आचेवर २०-२५ मिनिटे बेसन परतावे. बेसन भाजत आले कि बेसन मधून तूप सुटू लागते.

परतताना तूप चमकू लागले व बेसन लाल रंगाचे होऊन खमंग वास सुटला कि बेसन ताटात ओतावे.

बेसन थंड झाल्यावर साखर मिक्सरमध्ये दळून मिसळावी.तसेच वेलची-जायफळ पाउडर, चारोळी घालून बेसन हाताने मळावे व एकेक लाडूला एक बेदाणा लावून लाडू वळावेत.

तयार लाडू खाण्यासाठी सर्व्ह करा.

नोंद : कोणत्याही लाडवाचा भाजा भाजताना वनस्पती तुपा ऐवजी साजूक तूप घेतल्यास कमी लागते व लाडू खमंग होऊन मऊ राहतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या