Friday, June 21, 2024
Homeनगरसुपारी, सुगंधी तंबाखूची विक्री करणारा अटकेत

सुपारी, सुगंधी तंबाखूची विक्री करणारा अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

सुगंधी तंबाखू कब्जात बाळगणार्‍याला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. रशीद बशीरभाई फकीर उर्फ फकर्‍या (वय 47 रा. जानकी कवडेनगर, पाण्याचे टाकी जवळ, आलमगीर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून 47 हजार 500 रूपये किमतीची बारीक सुपारी, आठ हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, 11 हजार 700 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, दोन हजार 800 रूपये किमतीचे प्लॅास्टीकची 14 पाकीटे, 12 हजारांचा मोबाईल असा एकूण 82 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जानकी कवडेनगर, पाण्याचे टाकी जवळ, आलमगीर येथे एक इसमाने महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधीत तंबाखू विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात ठेवलेली आहे, अशी माहिती बुधवारी सकाळी सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच पथकाला छापा टाकणे कामी रवाना केले.

पथकाने नमूद ठिकाणी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे सुगंधी तंबाखू मिळून आली. रशीद बशीरभाई फकीर उर्फ फकर्‍या याला अटक केली असून त्याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भांदवि 188, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार विलास गारूडकर हे तपास करीत आहेत. सहाय्यक निरीक्षक मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अजय नगरे, बीभिषन दिवटे, संदीप साठे, अमोल आव्हाड, रूपाली शेलार यांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या