Friday, May 3, 2024
Homeनाशिकअफवा पसरविणार्‍यांपासून सावध राहा

अफवा पसरविणार्‍यांपासून सावध राहा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तब्बल दोन दशकात अनेकदा अप्रिय घटना घडून देखील शांतता ठेवत मालेगावकरांनी शहराचा नावलौकिक वाढविला आहे. काही दिवसांपुर्वी अफवांमुळे ( Rumors) अप्रिय घटना (Unpleasant incident) घडून शहरास वेठीस धरण्याचा केला गेलेला प्रयत्न चुकीचा आहे.

- Advertisement -

हे शहर कामगारांचे आहे येथे रोजीरोटीची चिंता सदैव असते. त्यामुळे जनतेने अफवा पसरविणार्‍या लोकांपासून सावध रहावे, असे आवाहन करीत कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी आगामी वर्षात मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे साकारली जाणार असल्याने शहरात विकास पर्व अवतरलेले दिसून येईल, अशी ग्वाही येथे बोलतांना दिली.

शहरातील कुसूंबारोडवरील शितल लॉज ते करीम नाका या रस्त्याचे मनपाच्या 7 कोटी निधीतून (fund) सिमेंट काँक्रीटीकरण (Cement concreting) कामाचे भुमीपूजन (bhumipujan) कृषिमंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर आयुक्त भालचंद्र गोसावी (Commissioner Bhalchandra Gosavi), उपमहापौर नीलेश आहेर (Deputy Mayor Nilesh Aher), स्थायी समिती सभापती जफर अहमद, सलीम अन्वर, असलम अन्सारी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांबद्दल मनपा पदाधिकारी तसेच अधिकार्‍यांचे कौतुक करत कृषिमंत्री भुसे पुढे म्हणाले, वडगावपासून कुसूंब्यापर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण झाले आहे. आता मनपाच्या निधीतून शितल लॉज ते करीम नाक्यापर्यंत 7 कोटी निधी खर्च करत सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. त्यामुळे हा रस्ता निश्चितच विकासाच्या दृष्टीकोनातून महत्वपुर्ण ठरणार आहे.

कुसूंबारोडवरून येणारी अवजड वाहनांची वाहतूक लेंडाणेपासून दसाणेमार्गे महामार्गावर वळवावी यासाठी केंद्र सरकारकडे (central government) प्रस्ताव देण्यात आला आहे. या संदर्भात लवकरच आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांची भेट घेवून विनंती करणार आहोत. कुसूंबारोडवरील गर्दी लक्षात घेता पोलिसांनी देखील अवजड वाहने (Heavy vehicles) शहरात येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

शहरात साकारणार्‍या रस्त्यांची गुणवत्ता मनपा अधिकार्‍यांनी तपासली पाहिजे, अशी स्पष्ट सुचना देत ना. भुसे यांनी जनतेने देखील रस्त्याचे काम चांगले दर्जाचे होत आहे किंवा नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. रस्ता निर्मिती अगोदर अधिकार्‍यांनी नादुरूस्त जलवाहिन्या दुरूस्त करून घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. शहरात बंद दरम्यान घडलेल्या हिंसक घटनांबद्दल कृषिमंत्री भुसे यांनी आपल्या भाषणात नाराजी व्यक्त केली.

अशा घटनांमुळे शहराच्या नावलौकिकास तडा जातो. अफवा पसरविणार्‍यांना शहराच्या हिताशी देणेघेणे नाही. त्यामुळे अशा लोकांपासून जनतेनेच सावध राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत ना. भुसे यांनी आगामी वर्षात शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे साकारली जाणार असल्याची माहिती दिली.

ज्यांनी 35 वर्षे आमदारकी व 10 वर्षाची मनपा सत्ता देखील भोगली आहे. असे विरोधक केलेली विकासकामे दाखवू शकत नाही परंतू काँग्रेसतर्फे (Congress) होत असलेल्या विकासकामांवर टिका करण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप महापौर ताहेरा शेख यांनी यावेळी बोलतांना केला. शहराचा विकास काँग्रेसच्या कारकिर्दीतच होत असल्याचे येथील जनतेने पाहिले आहे. विकासकामांची प्रक्रिया काँग्रेसतर्फे सुरू होताच विरोधक माहिती घेवून आंदोलन (agitation) छेडत असल्याचे कुसूंबारोडवर झालेल्या आंदोलनाव्दारे जनतेला दिसून आले आहे. आज 7 कोटीच्या मनपा निधीतून या रस्त्याचे काम सुरू होत आहे.

तर जुना आग्रारोडवर अन्सार पत्रा ते देवी मळ्यापर्यंत 10 कोटीच्या मनपा निधीतून रस्त्यचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. विकासकामे हीच आमची ओळख आहे. विरोधकांकडे दाखविण्यासाठी एकही विकासकाम नसल्याने ते दिशाभुल करण्याचे उद्योग करीत असतात. मात्र विरोधकांच्या या भुलथापांना जनता आता बळी पडणार नसल्याचे महापौर ताहेरा शेख यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

आपण विकास करतो तर विरोधक हे फक्त राजकारण करण्यात धन्यता मानतात. जनता दलाने शहराचा विकास न करता दंगली घडविल्या आहेत. आताही त्यांचे काही नगरसेवक फरार आहेत. ज्यांना अशांतता हवी ते शहराचा विकास कधीच करू शकत नाही, अशी टिका करत माजी आ. शेख रशीद यांनी गिरणा धरण पाणीपुरवठा योजना पाठपुरावा करत आपण मंजूर करून आणली. मात्र जनता दलाचे पदाधिकारी या कामाचे श्रेय घेण्यासाठी धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या