Wednesday, January 7, 2026
HomeनगरPathardi : भगवानगडाला वनविभागाची चार हेक्टर जागा देण्यास केंद्राची मंजूरी

Pathardi : भगवानगडाला वनविभागाची चार हेक्टर जागा देण्यास केंद्राची मंजूरी

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड येथे भक्तसेवा व सामाजिक विकासकामासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.

- Advertisement -

श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट, खरवंडी येथील वनभूमीचा वापर भक्तगणांच्या सुविधांसाठी, रूग्णालय, सामाजिक प्रशिक्षण केंद्र, वाहन पार्किंग आणि यात्री निवास यासाठी करण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने केंद्र सरकारकडे केली होती. या मागणीस सातत्याने पाठपुरावा केल्यावर अखेर बुधवारी केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाने अधिसूचना प्रसिध्द करून मंजुरी दिली आहे.

YouTube video player

महाराष्ट्र सरकारने यापूर्वी वन (संरक्षण व संवर्धन) अधिनियम अंतर्गत मंजूरी दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मंजूरी मिळाली असल्याचा आनंद आहे. श्रीक्षेत्र भगवानगड ट्रस्टकडून या मंजुरीचा उपयोग सामाजिक विकास, भक्तगणांच्या सुविधा आणि धर्मपरायण उपक्रमांसाठी केला जाणार असून भगवानगडचा सर्वांगीण विकास होऊन मंदिराचा विस्तार होत आहे. भव्य दिव्य असं संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर गडावर साकारत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...