Wednesday, January 7, 2026
HomeनगरParner : पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Parner : पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू

भाळवणी |वार्ताहर| Bhalawani

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील केटीवेअरमध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला. ही घटना शुक्रवारी(दि.20) सकाळी घडली. सुरेश सिध्दार्थ चव्हाण (वय 37, कोरेगाव, जि.सातारा, हल्ली रा. भाळवणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या खिशात आढळलेल्या डायरीवर बहिण व मेव्हण्याचा मोबाईल नंबर मिळाला. त्यांच्याशी पारनेर पोलिसांनी संपर्क केला आहे. सुरेशच्या आईवडीलांचेही निधन झालेले आहे.

- Advertisement -

सुरेश गेल्या सहा महिन्यांपासून भाळवणीतील एका भेळ सेंटरमध्ये वेटरचे काम करत होता. हॉटेल मालकाच्या खोल्यांमध्ये आपल्या मित्रांसमवेत तो राहात होता. दोघे मित्र दररोज नागेश्वर मंदिराजवळ असणार्‍या केटीवेअर आंघोळीसाठी दररोज जात होते. शुक्रवारी सकाळी सुरेश चव्हाण पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो वाहून गेला.

YouTube video player

1 तासानंतर स्मशानभूमी परिसरातील केटीवेअरजवळ त्याचा मृतदहे आढळून आला. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती सहाय्यक फौजदार राजेंद्र डोंगरे यांनी दिली. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...