Wednesday, January 7, 2026
HomeनगरNewasa : भानसहिवरेच्या गोदामात साडेचारशे गोण्या रेशनचा तांदूळ पकडला

Newasa : भानसहिवरेच्या गोदामात साडेचारशे गोण्या रेशनचा तांदूळ पकडला

आजूबाजूच्या रेशनिंग दुकानदारांकडून काळ्या बाजारात तांदूळ खरेदी केल्याचा दावा

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

रेशन दुकानदारांकडून खरेदी करुन काळ्या बाजारात विक्रीसाठी भानसहिवरा येथील गोदामात ठेवलेला 11 लाख 25 हजार रुपये किमतीचा साडेचारशे गोण्या तांदूळ स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडला. याप्रकरणी संबंधीतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दि. 17 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गोपनिय माहिती मिळाली की, संदीप सुभाष शिंदे रा. भानसहिवरे याने भगवान पुंड रा. करजगाव तसेच आजुबाजुचे रेशनिंग दुकानदार यांचेकडुन विनापरवाना रेशनिंगाचा तांदूळ खरेदी करुन तो संजय अग्रवाल, गजानन ऍग्रो करोडी ता.जि. छत्रपती संभाजीगनर येथे विक्री करण्याकरीता त्याच्या भानसहिवरे गावातील गोडावूनमध्ये साठवणूक करुन ठेवला आहे.

YouTube video player

मिळालेल्या माहितीवरुन पथकाने नेवासा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार तसेच पंचासमक्ष भानसहिवरे येथील संदीप सुभाष शिंदे याच्या गोडावूनमध्ये छापा टाकला. तिथे संदीप सुभाष शिंदे (वय 35) दिसला. त्याच्याकडे तांदूळाबाबत विचारपूस करता त्याने सदरचा तांदुळ हा रेशनिंगचा असून तो भगवान पुंड रा. करजगाव, ता. नेवासा याचेकडून तसेच आजुबाजुचे रेशनिंग दुकानदार यांचेकडून काळ्याबाजारामध्ये खरेदी केला. हा तांदूळ संजय अग्रवाल गजानन ऍग्रो करोडी ता. जि. छत्रपती संभाजीगनर यास विक्री करण्यासाठी घेतलेला असल्याचे सांगितले.
पंचासमक्ष सदर गोडावुनची पाहणी केली असता त्यामध्ये 450 गोण्यामध्ये एकूण 22 हजार 500 किलो तांदूळ असा एकूण 11 लाख 25 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश नवनाथ मांडगे यांच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 899/2025 जिवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संतोष खैरे, रमिझराजा आत्तार, प्रकाश मांडगे यांचे पथक व अंमलदार तसेच सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांनी केली.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...