Sunday, September 29, 2024
Homeनगरभंडारदरा, मुळात पाण्याची आवक मंदावली

भंडारदरा, मुळात पाण्याची आवक मंदावली

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात अधूनमधून पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याची आवक मंदावली आहे.
गत 24 तासांत केवळ 266 दलघफू पाणी दाखल झाले. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 3622 दलघफू झाला होता. भंडारदरा परिसरात पाऊस कमी असल्याने गत 24 तासांत निळवंडे धरणात 60 दलघफू पाणी आले. त्यामुळे या धरणातील काल सकाळी 1207 दलघफू पाणीसाठा झाला होता.

- Advertisement -

गत 24 तासांत पडलेला पाऊस असा (मिमी) भंडारदरा 1, घाटघर 27, पांजरे 19, रतनवाडी 17. काल भंडारदरा परिसरात पडलेल्या पावसाची नोंद 1 मिमी झाली आहे. मुळा पाणलोटातही पाऊस अचानक ओसरल्याने मुळा नदीतील विसर्ग घटला आहे. परिणामी धरणाकडे येणारी आवक मंदावली आहे. मुळा धरणातील पाणीसाठा 7492 दलघफू (28.82 टक्के) झाला होता. मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 886 क्युसेक होता. आढळा धरणात 11 दलघफू पाण्याची आवक झाली असून 463 दलघफू साठा झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या