Tuesday, January 6, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा परिसरात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करताना नियम पाळा

Bhandardara : भंडारदरा परिसरात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करताना नियम पाळा

प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन || अनेक कडक निर्बंध

भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara

भंडारदरा, कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात (Kalsubai-Harishchandragad Sanctuary Area) ‘थर्टी फर्स्ट डिसेंबर’ साजरा करताना पर्यटकांना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागणार आहे. वन्यजीव विभाग, वन विभाग (Forest Department) आणि पोलीस प्रशासनाने 31 डिसेंबर साजरा करताना निर्बंध घातले असून नियम (Rule) पाळण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

संपूर्ण राज्याचे आकर्षण असणार्‍या भंडारदरा, कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर 31 डिसेंबरचा उत्सव (Thirty-First December Celebration) साजरा केला जातो. मोठमोठ्या शहरातून पर्यटक आणि नागरिक याठिकाणी 31 डिसेंबर साजरा करतात. मोठ्या प्रमाणावर गर्दी या परिसरात उसळलेली असते. अनेक कुटुंबे, लहान मुले, त्याचबरोबर तरुण-तरुणी सर्वजण यात सहभागी असतात. त्या परिसरातले व्यावसायिक वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असतात, यातून वन्यजीवांना, अभयारण्याला, पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचू नये म्हणून वन्यजीव विभाग, वन विभाग (Forest Department) आणि पोलिसांनी (Police) नियमबाह्य कृती करण्यास कडक निर्बंध घातले आहेत.

YouTube video player

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा वन विश्रामगृह शेंडी येथे पोलीस, वन्यजीव विभाग, हॉटेल मालक व टेंट कॅम्पिंग चालक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित, सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी उपस्थितांना विविध सूचना केल्या आहेत आणि या सूचनांचे योग्यरित्या पालन करण्याचे बजावले आहे.

तसेच डीजे व मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम यंत्रणा, मोठ्या आवाजातील फटाके यांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पर्यटकांना रात्री जंगल क्षेत्रात फिरण्यास बंदी असून अभयारण्यात मद्यपान, धूम्रपान तसेच कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांच्या सेवनास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ, घातक शस्त्र सोबत बाळगण्यासही पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

ताज्या बातम्या