भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा भंडारदरा धरण (bhandardara dam) परिसरात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बीग बजेट हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे.
निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण लाभलेल्या चित्रपट सृष्टीत मिनी कश्मीर (kashmir) म्हणून ओळख असणार्या भंडारदरा धरण परिसरात पुर्वी राम तेरी गंगा मैली (ram teri ganga maili) , जान, इतिहास, हिना, राजुचाचा, कुर्बान, बादल, कटी पतंग, मैने प्यार किया (maine pyar kiya), गुलछडी, भिंगरी, चिनु अशा अनेक हिंदी, मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. त्यामधील अनेक चित्रपट किंवा त्यामधील गाणी सुपरहिट देखील झाले.
मात्र परिसरातील सोयीसुविधांची व रस्ते वाहतूकीच्या कारणास्तव चित्रपट निर्मात्यांनी भंडारदरा परिसराकडे पाठ फिरवली होती मात्र नाशिक येथील लाईन निर्माते अमित कुलकर्णी यांच्या साहाय्याने भंडारदरा परिसरात पुन्हा बीग बजेट चित्रपट चित्रीकरणाला सुरुवात झाली असून चित्रीकरण सुरू असताना स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून परिसराचा नावलौकिक कसा वाढविता येईल असा मानस असल्याचे अमित कुलकर्णी यांनी सांगितले.
आशिकी-2 चे निर्माते मोहीत सुरी यांच्या आगामी ‘विलेन रिटन्स’ नावाचा सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेता जॉनअब्राहम व दिशा पटनी यांची प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण भंडारदराची शान असणार्या अंब्रेला फॉल समोरील ब्रिजवर करण्यात आले. बर्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर चित्रीकरण होत असल्याने रसिक प्रेक्षकांची गर्दी उसळली होती. तर अनेक चाहते कलाकारांसोबत फोटो काढण्यासाठी धडपड करत होते मात्र करोनाच्या कारणास्तव फोटो सेशन टाळले.