Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमAkole : भंडारदरा धरण परिसरात आढळला महिलेचा सांगाडा

Akole : भंडारदरा धरण परिसरात आढळला महिलेचा सांगाडा

अकोले |प्रतिनिधी| Akole

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी समजल्या जाणार्‍या भंडारदरा धरणाच्या पायथ्याला एका 25 ते 30 वर्षे वयाच्या महिलेचा सांगाडा शनिवारी (दि.13) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचा खून झाला की तिने आत्महत्या केली याचे गूढ शोधून काढण्याचे मोठे आव्हान राजूर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

- Advertisement -

भंडारदरा धरणाच्या पायथ्याला वन विभागापासून अगदी हाकेच्या अंतरावर महादेव मंदिराच्या परिसरात एका नाल्यामध्ये स्त्री जातीचा एक सांगाडा आढळून आला आहे. सदर सांगाडा हा एका महिलेचा असून महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असण्याची शक्यता आहे. सदर महिलेचा मृतदेह हा तीन ते चार महिन्यांपूर्वी या परिसरात एकाच जागेवर असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. महिलेच्या अंगावर एक टॉप असून कमरेला निळ्या रंगाची लेखी दिसून येते आहे. अंगावरील कपड्यांची सुते ही अलग अलग झाली असून कुजली आहेत.

YouTube video player

राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी संभाजी सांगळे, ढवळा पथवे, मुठे, महिला कर्मचारी सुवर्णा शिंदे यांनी जागेवरच पंचनामा करून मृतदेहाला मूठमाती दिली आहे. भंडारदरा परिसरात अशाप्रकारची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचा खून की आत्महत्या याचा तपास करण्याचे मोठे आव्हान राजूर पोलिसांच्या पुढे उभे राहिले आहे.

दरम्यान, राजूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या कार्यकाळात रंधा धबधबा येथे एक मृतदेह सापडला होता. सदर व्यक्ती ही कोण व कुठली याचा तपास अद्याप लागलेला नसतानाच दुसरी घटना घडल्याने पोलीस विभाग कशा पद्धतीने तपास करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. सदर घटनेच्या पंचनाम्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांची आवश्यकता असताना पोलीस विभागाने परिसरातील प्रत्येक विभागाला फोन करूनही महिला कर्मचार्‍यांनी मात्र पंचनाम्याला येण्यासाठी दिरंगाई दाखविल्याने खेद व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ जानेवारी २०२६ – जगाच्या ठेकेदाराची दादागिरी

0
अमेरिका स्वतःला जगाचा एकमेव तारणहार-पालनहार समजते आणि या गृहीतकाला सगळ्या जगाने मान तुकवून मान्यता द्यावी असा अट्टहास नेहमी सुरु असतो. त्यासाठीच मनमानी करून वाट्टेल...