Tuesday, October 22, 2024
Homeनगरभंडारदरा धरणावर दुसर्‍या दिवशीही ड्रोनच्या घिरट्या, धरणाची सुरक्षा धोक्यात

भंडारदरा धरणावर दुसर्‍या दिवशीही ड्रोनच्या घिरट्या, धरणाची सुरक्षा धोक्यात

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्हाची जीवनरेषा समजल्या जाणार्‍या आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे उर्फ भंडारदरा धरणावर काल रविवारी सलग दुसर्‍या दिवशीही काही ड्रोन घिरट्या घालताना आढळून आले आहेत. सदर ड्रोनमुळे धरणाच्या सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. भंडारदरा धरण 100% भरलेले आहे. गेल्या दोन दिवसापासून भंडारदरा धरणावर रात्रीच्या सुमारास दहा ते अकरा ड्रोन घिरट्या घालताना दिसत आहेत. सदर ड्रोन हे पाबरगडाच्या दिशेने येत असून ते भंडारदरा धरण,कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यातील, रतनवाडी, घाटघर, अलंग-कुलंग-मलंग किल्ले, कळसुबाई पर्वतरांग, वाकी व परत पाबरगडाच्या दिशेने जाताना दिसून येत आहेत. दोन दिवसापासून दिसत असलेल्या या ड्रोनमुळे वनविभाग व पोलीस विभाग सतर्क झाले आहे.

- Advertisement -

राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे वनपाल शंकर लांडे व त्यांच्या कर्मचार्‍यांनी भंडारदरा धरणाच्या भिंतीवर सदर ड्रोन उडताना दिसत असल्याचे बघितले. ड्रोनसंदर्भातील माहिती पोलीस विभागाकडून वरिष्ठांना कळविण्यात आली आहे. सदर ड्रोनबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. भंडारदरा धरण आधीच दहशतवाद्यांच्या रडारवर आहे. यामुळे धरणाला पोलीस सरंक्षण देण्यात आहे होते. आता धरणावर ड्रोन उडताना बघितल्यामुळे ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सदर ड्रोन नेमक्या कोणत्या कारणास्तव उडत आहे.

याची माहिती प्रशासनालाही उपलब्ध होऊ शकली नाही. या ड्रोनद्वारे काही शासनाचा सर्वे चालू आहे का?असाही प्रश्न उपस्थित होत आहे. हवेत उडत असलेल्या ड्रोनमुळे पोलीस विभाग व वन विभागाने जितकी सतर्कता दाखवली तितकी सतर्कता भंडारदरा धरण शाखेकडून मात्र दाखविली गेली नाही. धरणाची सुरक्षिता ही अतिशय महत्त्वाची असून भंडारदरा धरणावर उडत असलेले ड्रोन हे नक्की कुणाचे आहेत? आपत्ती व्यवस्थापनाकडे याची काही माहिती उपलब्ध आहे का? महसूल विभागाकडून सदरची माहिती वरिष्ठांना कळविले गेली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या