Monday, June 17, 2024
Homeनगरभंडारदरात 8 दलघफू पाणी नव्याने दाखल

भंडारदरात 8 दलघफू पाणी नव्याने दाखल

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात मान्सूनचे आगमन झाले असून काल पहाटे झालेल्या सलामीच्याच पावसामुळे धरणात 3 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. त्यानंतर रविवारी रात्री पाणलोटात झालेल्या पावसाने सोमवारी धरणात 8 दलघफू पाण्याची नव्याने आवक झाली.

11039 दलघफू क्षमतेच्या भंडादरा धरणातील पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे मान्सून पाणलोटात कधी दाखल होतो याकडे शेतकरी आणि नागरिकांच्या नजरा लागून होत्या. अखेर मान्सून पाणलोटात दाखल झाला असून काल पहाटे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान मान्सूनचा पाऊस कोसळला.

त्यानंतर रात्री पाऊस झाल्याने त्यामुळे धरणात नव्याने पाणी दाखल झाले. आतापर्यंत एकूण नव्याने 20 दलघफू पाणी जमा झाले आहे. भंडारदरात पडलेल्या पावसाची नोंद 25 मिमी झाली आहे. काल या धरणातील पाणीसाठ 1065 दलघफू होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या