लोणी (वार्ताहर)
भंडारदरा धरणातून ७ जानेवारी २०२६ रोजी सिंचन आणि बिगर सिंचनाचे आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
भंडारदरा लाभ क्षेत्रात रब्बी पिकांसाठी पाण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेवून मंत्री विखे पाटील यांनी आवर्तानचे वेळापत्रक निश्चित करण्यास विभागाच्या अधिका-यांना सांगितले होते.
सद्य परिस्थितीत धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेवून जलसंपदा विभागाने रब्बी हंगामातील आवर्तनाचा कालावधी निश्चित केला आहे.
सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तनाचा कालावधी एकत्रितपणे निश्चित केला असून, सदर आवर्तन ७ जानेवारी पासून सुरू होईल. लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी मिळण्यासाठी विभागाने आवर्तन कालावधीत गांभिर्याने दक्षाता घेण्याच्या सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.




