Friday, November 22, 2024
Homeनगरभंडारदरा धरणातील पाणीसाठा 12 टक्क्यांवर

भंडारदरा धरणातील पाणीसाठा 12 टक्क्यांवर

पिंपळगाव खांड धरणात 218 दलघफू पाणीसाठा

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत असल्याने धरणात पाण्याची आवक होत आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 12 टक्क्यांवर पोहचला आहे.
11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात यंदा केवळ 9 टक्के साठा होता. त्यात हळुवार आवक होत असल्याने हा पाणीसाठा आता 12 टक्क्यांवर (1351 दलघफू) पोहचला आहे. काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 67 दलघफू पाणी दाखल झाले.

- Advertisement -

घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक होत आहे. अधून मधून पडणार्‍या पावसामुळे पाणलोट हिरवागार होऊ लागला आहे. पावसाळी वातावरण टिकून असल्याने गारवा निर्माण झाला आहे. काल दिवसभरात भंडारदरात पडलेल्या पावसाची नोंद 10 मिमी झालेली आहे.

पिंपळगाव खांड धरणात 218 दलघफू पाणीसाठा

कोतूळ |वार्ताहर| Kotul

नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी, उद्योग आणि व्यापाराच्यादृष्टीने महत्त्वाच्या मुळा धरण पाणलोटात काल पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुळा धरण पाणलोट क्षेत्रात आंबित, पाचनई, कुमशेत हरिश्चंद्रगड परिसरात अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने मुळा नदीचा प्रवाह टिकून आहे. 200 ते 300 क्युसेकचा विसर्ग आंबित धरणाच्या सांडव्यावरून सुरू आहे. परिणामी मुळा नदीवरील 600 दलघफू क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरणाचा पाणीसाठा 218 दलघफूपर्यंत पोहचला आहे. या वर्षात या धरणात आजअखेर 118 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आहे.
दरम्यान, लाभक्षेत्रात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने आंबित आणि पिंपळगाव खांड धरणातून मुळा नदीत पाणी सोडण्यात यावे, असे आदेश आ. डॉ. किरण लहामटे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या