Wednesday, June 19, 2024
Homeनगरभंडारदरा पाणलोटात काजव्यांचे आगमन

भंडारदरा पाणलोटात काजव्यांचे आगमन

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

भंडारदरा पाणलोटात काजव्यांचे तुरळक प्रमाणात काजव्यांचे आगमन झाले असून आगामी काही दिवसांत काजव्यांची मायावी दुनिया येथे अवतरणार असून पर्यटकांना पर्वणी मिळणार आहे. दरम्यान, काजव्यांचे आगमन होत असल्याने यंदा पाणलोटात लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्याचा कयास आदिवासी बांधवांचा आहे. त्यामुळे या भागात शेती कामांनी वेग घेतला आहे.

वळवाच्या पाऊस कोसळत असल्याने सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत काजवांच्या मिलनाचा उत्सव सुरू झाला आहे. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लुकलुकणारे काजवे दिसू लागले आहेत. आठ दहा दिवसांत काजव्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शहरी नागरिकांना निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार दाखविण्यासाठी अनेक पर्यटन संस्थांनी काजवा महोत्सवांचे आयोजन केले आहे. दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा-घाटघर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते.

राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोळटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली जातील. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा ‘बसेरा’ वाढणार आहे. हे सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांची पावले या भागाकडे वळणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या