Thursday, May 22, 2025
Homeनगरभंडारदरा ओव्हरफ्लो; प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू

भंडारदरा ओव्हरफ्लो; प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात काल रविवारी पावसाने जोर धरल्याने तुंडूब असलेल्या भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वाढल्याने या धरणातून प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. काल रविवारी सायंकाळी 6 वाजता या धरणातून 3256 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर 7.30 वाजता हा विसर्ग 4400 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. पाणलोटात पाऊस पुन्हा सुरू झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, भंडारदरातून सोडण्यात येणारा विसर्ग तसेच कृष्णवंतीचे पाणी जमा होत असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठा तासागणिक वाढू लागला आहे. पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास आज सोमवारी या धरणातील पाणीसाठा पुन्हा 90 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 7001 दलघफू (84.67टक्के) झाला होता.

आख्ख्या नगर जिल्ह्यात नगरकर पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. भंडारदरा पाणलोटातूनही मान्सूने पाय काढला होता. त्यामुळे सर्वचजण चिंतेत होते. पण भंडारदरा पाणलोटात गत तीन दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरूवार, शुक्रवारी अधूनमधून सरी कोसळत होत्या. परिणामी पाण्याची आवक होत होती. त्यामुळे विद्युत गृह क्रमांक 1 मधून 820 क्युसेकने पाणी पुन्हा सोडण्यास सुरूवात झाली.

रविवारी पहाटेपासूनच पाणलोटात पावसाने जोर धरला. त्यामुळे या भागातील धबधबे पुन्हा सक्रीय झाले. ओढेनाले भरभरून वाहु लागले. सहाजिकच धरणात पाणी वाढू लागले. 11039 क्षमतेचे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने जशी आवक होऊ लागली. तसतशी या धरणातून विसर्ग वाढविण्या येऊ लागला. सकाळी 11 वाजता स्पिलवेतून पाणी सोडण्यास सुरूवात झाली. त्यानंतर दुपारी 3 वाजता हा विसर्ग वाढविण्यात येऊन तो 1208 क्युसेक करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी तो 2436 करण्यात आला. गत 12 तासात धरणात नव्याने 63 दलघफू पाणी आले. ते खाली निळवंडे धरणात सोडण्यात आले. तसेच वाकी तलावातूनही 197 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दिवसभरात भंडारदरा परिसरात 23 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास धरणातून विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे.

मुळा पाणलोटात हलक्या सरी

नगर जिल्हयातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोटात काल रविवारी दिवसभर हलक्या सरी कोसळत होत्या. तर अधून मधून जोरदार सरी कोसळत होत्या. दिवसभर पाणलोटात झाकोळलेले होते. काल सायंकाळी कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 502 क्युसेक होता. तर धरणातील पाणीसाठा 20498 दलघफू (79 टक्के) झाला होता. धरणातून 1625 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे उदाहरण देणारी घटना; कुठे आणि नेमके काय घडले?…

0
  देवगाव। वार्ताहर Devgaon प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे उदाहरण देणारी घटना (दि.20) रोजी भरवसफाटा-कोळपेवाडी रस्त्यालगत महालक्ष्मी मंगल कार्यालयात घडली. विवाहसोहळ्यात हरवलेली 2 तोळ्यांची सोन्याची पोत प्रामाणिकपणे मूळ...