Friday, November 22, 2024
Homeनगरभंडारदरातून पाऊस पुन्हा गायब

भंडारदरातून पाऊस पुन्हा गायब

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा धरण पाणलोटात काल पावसाचे पुन्हा काढता पाय घेतल्याने धरणात येणारी आवक मंदावली आहे. काल सायंकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने केवळ 3 दलघफू पाणी दाखल झाले. त्यापूर्वीच्या 12तासांत23 दलघफू पाणी आले.

- Advertisement -

11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात यंदा केवळ 9 टक्के होता. त्यात हळुवार आवक होत असल्याने हा पाणीसाठा काल सायंकाळी 1420 दलघफू (12.86 टक्के) पुढे सरकला होता. काल दिवसभर केवळ पावसाळी वातावरण होते. 102 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावातील पाणीसाठा 52.29 दलघफू झाला आहे.

पिंपळगाव खांड धरण निम्मे भरले

कोतूळ |वार्ताहर| Kotul

नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी, उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्वाच्या मुळा धरण पाणलोटात रविवारी जोरदार पाऊस झाल्याने भातरोपांना जिवदान मिळाले आहे. तर 600 दलघफू क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरण निम्मे भरले आहे.
मुळा धरण पाणलोट क्षेत्रात आंबित पाचनई कुमशेत हरिश्चंद्रगड परिसरात अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. काल तासभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भातरोपांना जिवदान मिळाले. हा पाऊस झाल्याने मुळा नदीचा प्रवाह आंबित धरणाच्या सांडव्यावरून सुरू आहे.

परिणामी मुळा नदीवरील 600 दलघफू क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरणाचा पाणीसाठा काल रविवारी 256 दलघफू पर्यंत पोहचला होता. सोमवारी हा पाणीसाठा 318 दलघफू झाला आहे. पाणलोटात काल सोमवारीही अधून मधून पाऊस कोसळत होता. अकोले शहर व परिसरातही जोरदार पाऊस झाला. मुळा पाणलोटात पावसास सुरूवात झाल्याने हरिश्चंद्र गड व अन्य ठिकाणचे सौंदर्य बहरू लागले आहे. धबधबे, ओढेनाले सक्रिय झाल्याने मनमोहक चित्र पहावयास मिळत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या