Saturday, September 21, 2024
Homeनगरभंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर वाढला

भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर वाढला

धरणात नव्याने पाण्याची आवक

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात शुक्रवारच्या तुलनेत काल शनिवारी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे आज रविवारी धरणात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. गत आठवड्यात मान्सून दाखल झाल्यानंतर काही दिवस मान्सून गायब झाला होता. पण घाटघरला पाऊस कोसळत असल्याने घाटघर धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे या प्रकल्पातून 300 क्युसेकने पाणी भंडारदरा दिशेने येत आहे. काल दुपारी भंडारदरा व पाणलोटात अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने अल्पशा प्रमाणात धरणात पाण्याची आवक होत आहे.

शुक्रवारी दुपारी 12 वाजता आणि दुपारी 4 वाजता पाऊस झाला. बाजार असल्याने बाजारकरूंची दाणादाण उडविली. 7 दलघफू पाण्याची आवक झाल्याने सकाळी 8 वाजता 11030 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात 1134 दलघफू पाणीसाठा झाला होता. सायंकाळी हा साठा 1139 दलघफू झाला होता. गत आठ दिवसांत एकूण 94 दलघफू पाणी आले आहे. दरम्यान काल शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 11 दलघफू पाण्याची नवीन आवक झाली. घाटघर, रतनवाडी, पांजरे परिसरात काल पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे नेकलेस व अन्य धबधबे सक्रीय झाले आहेत. ओढेनाले वाहू लागले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या