Friday, May 16, 2025
Homeनगरभंडारदरातील पाणीसाठा 4000 दक्षलक्ष घनफुटावर

भंडारदरातील पाणीसाठा 4000 दक्षलक्ष घनफुटावर

भंडारदरा, कोतूळ|वार्ताहर|Bhandardara

- Advertisement -

उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात पाऊस टिकून असल्याने धरणांत नव्याने पाणी दाखल होत आहे. 11039 क्षमतेच्या भंडारदरात काल सायंकाळी संपलेल्या 36 तासांत 381 दलघफू पाणी आले. त्यामुळे पाणीसाठा 3918 दलघफू झाला होता. सुरू असलेला पाऊस आणि आवक यामुळे पाणीसाठा रात्री 4000 दलघफूच्या पुढे सरकला होता.

निळवंडे धरणातही पाण्याची आवक होत असल्याने या धरणातीलही पाणीसाठा निम्म्याच्या पुढे गेला आहे. काल सकाळी साठा 4164 दलघफू झाला होता. वाकी धरणातून 356 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पाणलोटात पाऊस सुरू असल्याने परिसर हिरवागार झाला आहे. धबधबेही सक्रीय असल्याने सौंदर्य आणखी बहरले आहे.

पण करोनाच्या पार्श्वभूमीवर हे सौंदर्य न्याहळण्यासाठी पर्यटक नाहीत. मुळा पाणलोटात काल पावसाची उघडीप झाली आहे. तरीही पाण्याची आवक सुरू असल्याने मुळा धरणातील पाणीसाठा 8300 दलघफू झाला होता. भंडारदरा पाणलोटातील पाऊस मिमीमध्ये भंडारदरा 45, घाटघर 67, रतनवाडी 57, पांजरे 52, वाकी 40.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखेंच्या अध्यक्षतेखाली साई संस्थानच्या व्यवस्थापनासाठी प्रशासकीय समिती स्थापन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाचे नियंत्रण आणि कार्यान्वयन अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रशासकीय समिती स्थापन करण्यासाठी साईबाबा संस्थानला कळवण्यात आले...