Saturday, July 27, 2024
Homeनगरभंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस

भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पाचव्या दिवशी पावसाचा जोर वाढल्याने काल शनिवारी सायंकाळी विसर्ग 4295 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे निळवंडे धरणात पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी हे धरण 6868 दलघफू (82.61) झाला असून रविवारी हे धरण 94 टक्के भरणार आहे.

- Advertisement -

गत आठवड्यापूर्वी पाणलोटात पावसाने काढता पाय घेतला होता. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. पण गत पाच दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले. एवढेच नव्हे तर आता विसर्ग वाढल्याने निळवंडे धरणही भरण्याची शक्यता वाढली आहे.

काल सकाळी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार रतनवाडीत तीन इंच पावसाची नोंद झाली आहे. तर भंडारदरात काल दिवसभरात 19 मिमी पावसाची नोंद झाली. वाकीचा ओव्हरफ्लोही वाढला असून तो विसर्ग 197 क्युसेकपर्यंत गेला आहे. रात्री 7 वाजेनंतर पाणलोटात जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे भंडारदरा धरणातील विसर्ग आणखी वाढणार आहे.

दरम्यान, लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने चितेंचे वातावरण असतानाच भंडारदारात पाऊस सुरू असल्याचे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मुळा 21000 दलघफू

कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने धरणाकडे होणारी आवक घटली आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा20972 दलघफू झाला होता. सायंकाळी तो 21000 दलघफूच्या पुढे सरकला. धरणात 2441 क्युसेकने आवक सुरू होती. ती सायंकाळी कमी झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या