Friday, November 22, 2024
Homeनगरजामिनासाठी माजी आमदार मुरकुटेंचा जिल्हा न्यायालयात अर्ज

जामिनासाठी माजी आमदार मुरकुटेंचा जिल्हा न्यायालयात अर्ज

अत्याचार प्रकरण || 16 ऑक्टोबरला सुनावणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास काशिनाथ मुरकुटे यांना अत्याचाराच्या गुन्ह्यात राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी जामिनासाठी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात काल, सोमवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, या अर्जावर येत्या बुधवारी (16 ऑक्टोबर) जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. महेश तवले यांनी दिली.

- Advertisement -

अनेक आमिषे दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याच्या आरोप करत पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच सोमवारी (7 ऑक्टोबर) मध्यरात्री राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या श्रीरामपूर येथील निवासस्थानावरून ताब्यात घेत अटक केली होती.

त्यांना मंगळवारी (8 ऑक्टोबर) राहुरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा गुरूवारी (10 ऑक्टोबर) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी अ‍ॅड. तवले यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी काल, सोमवारी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने अर्ज दाखल करून घेत त्यावर 16 ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या