Monday, September 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Fire News : मुंबई-नाशिक महामार्गावरील जिंदाल कंपनीला भीषण आग; जीवितहानी टळली

Nashik Fire News : मुंबई-नाशिक महामार्गावरील जिंदाल कंपनीला भीषण आग; जीवितहानी टळली

इगतपुरी | वार्ताहर | Igatpuri

मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai Nashik Highway) मुंढेगाव शिवारात (Mundhegaon Area) असलेल्या जिंदाल पॉलीफिल्मस कंपनीच्या (Jindal Company) परिसरात मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसून, धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर परिसरात पसरले होते.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) लागल्याचे समजते. कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठवलेले होते. याच भागातून आगीची सुरुवात झाली. बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगरपरिषद, महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक येथून अग्निशमन दलाच्या ६ ते ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.ही आग लागल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच आग (Fire) लागण्याचे नेमके कारण काय? याचा तपास सुरू असून, सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

ताज्या बातम्या

Amit Shah : प्रत्येक प्रादेशिक भाषा समृद्ध करणे हेच केंद्र सरकारचे...

0
मुंबई | Mumbai सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे ( Official Language Conference) आणि हिंदी दिवसाचे औचित्य साधून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री...