Friday, November 15, 2024
Homeमुख्य बातम्याभारत बंद : शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन

भारत बंद : शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन

दिल्ली | Delhi

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पारीत केलेल्या कृषी विधेयकाला देशभरातून विरोध होत असून आज देशातील विविध शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. तसेच याविरोधात शेतकरी संघटना देशव्यापी आंदोलन करणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने भारत बंदचे आवाहन केले असून यात देशभरातील शेतकरी संघटना, शेतकरी सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

या आंदोलनात भारतीय शेतकरी युनियनसहीत वेगवेगळ्या शेतकरी संघटना सामील झाल्या आहेत. देशभर चक्का जाम करण्याची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये ३१ संघटनांचा समावेश आहे. शतकरी संघटनांना काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, अकाली दल, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यासहीत अनेक पक्षांकडून पाठिंबा मिळाला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या