मुंबई | Mumbai
सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना दुसरीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी गेले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. अखेर रविवारी एकनाथ शिंदे यांनी मूळ गाव दरेगावाहून ठाण्यात दाखल झाले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले असले तरी गृहमंत्रीपद मिळावे यास या मागणीवर ते ठाम आहेत. दुसऱ्या बाजूला गृहमंत्रीपद सोडण्यास भाजपा व देवेंद्र फडणवीस तयार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता गृहखात्यावरून महायुतीत तिढा वाढला आहे. एकनाथ शिंदे हे अचानक गावी गेल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू होती. मात्र, शिंदे हे गावी का गेले हे, याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.
आमदार गोगावले म्हणाले, शिवसेनेने कुठलाही हट्ट धरलेला नाही. तसेच महायुतीबाबत प्रसारमाध्यमे सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या देत आहेत, त्यात तथ्य नाही. शिवसेनेने गृहमंत्रीपदाचा हट्ट धरल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत. गोगावले म्हणाले, शिवसेनेने कुठलाही हट्ट धरलेला नाही. तसेच महायुतीबाबत प्रसारमाध्यमे सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या देत आहेत, त्यात तथ्य नाही. शिवसेनेने गृहमंत्रीपदाचा हट्ट धरल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत.
पुढे ते असे ही म्हणाले, राजकारणात काही समीकरणे असतात, ही समीकरण जमवावी लागतात. त्यासाठीची वरिष्ठांमध्ये चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. आम्हाला अधिकाधिक खाती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणताही पक्ष आपल्यासाठी अधिक खाती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात, असेही भरत गोगावले यांनी म्हटले. एकनाथ शिंदे हे नाराज वगैरे या सगळ्या चर्चा आहेत. तिन्ही पक्षात कोणतीही कटुता नाही. महायुतीचे सरकार स्थापन होईल आणि चांगली कामगिरी सरकार करेल असेही त्यांनी म्हटले.
आमच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना सत्तेत राहण्याचा आग्रह केला. तेव्हा मला २ दिवस गावी जाऊन येऊ द्या, मला थोडे निवांत राहून विचारविनिमय करू द्यावा. आमच्या सगळ्यांचा आग्रह हा त्यांनी सत्तेत राहावा यासाठी आहे. उपमुख्यमंत्री कोण याबाबत आता काही सांगू शकत नाही. सर्वस्वी जबाबदारी आम्ही मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे. ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावंद्य आहे. सत्तेच्या प्रक्रियेत साहेबांनी सहभागी व्हावे हेच आम्हाला वाटते असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच ज्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा त्यांनी शपथविधी कधी ठेवायचे हे ठरवणे गरजेचे असते, विश्वासात न घेता शपथविधी घेतला जातोय हे म्हणणे बरोबर नाही. दिल्लीला बैठक झाली, तेव्हा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अमित शाह, जे.पी. नड्डा तिथे काही तरी ठरल्याशिवाय अशी तारीख दिली जाणार नाही. ५ डिसेंबरला शपथविधी करायचा आहे, त्याची तयारीही आझाद मैदानावर सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊनच हे सगळे होतेय, कुणाला बाहेर ठेवले जातेय हे म्हणणे चुकीचे आहे, असेही भरत गोगावले यांनी म्हटले.