Friday, November 22, 2024
Homeजळगावभारतीय छात्र संसद २० फेब्रुवारीपासून दिल्लीत

भारतीय छात्र संसद २० फेब्रुवारीपासून दिल्लीत

जळगाव । प्रतिनिधी

भारतीय छात्र संसद फाउंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेतर्फे तीन दिवसाच्या भारतीय छात्र संसदेचे 20 ते 23 फेब्रुवारी दरम्यान विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजन केले आहे.

- Advertisement -

दरवर्षी 2011 पासून छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून संसदेचे हे दहावे वर्ष असल्याची माहिती संसदेचे राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक वीराज कावडीया, उमवि विद्यार्थी विभागाचे संचालक डॉ. सत्यजीत साळवे, रोहन सोनवणे, सिध्देश्वर लटपटे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवा सेनेचे अंकित कासार यांनी पत्रकार परिषदेत दिली. चार दिवस चालणार्‍या या संसदेला अनेक राष्ट्रीय संस्थांनी या संसदेला पाठिंबा दिला आहे.

छात्र संसदेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून राहुल कराड हे आहेत. तर भारत सरकारचे युवक कल्याण क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू हे पॅट्रन आहेत. यावेळी कॉमन मॅन प्रोटेक्शन फोर्सचे संस्थापक पवन कल्याण, ना. श्रीमती स्मृती झुबिन इराणी, माजी खा. ज्योतिरादित्य सिंधिया, शेखर गुप्ता, कंट्री फर्स्ट फाउंडेशनचे सस्थापक शिव खेरा, माकपचे प्रकाश करात, जितेंद्रसिंह, राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर, प्रल्हाद जोशी, डॉ. पंकज मित्तल यांचेसह इतर मान्यवर संबोधित करणार आहेत. 16 जानेवारीपासून सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे.

आठ सत्राचे आयोजन

पहिले सत्रात सोशल मीडिया आणि सेलिब्रिटी- आदी समजा मग झुका, आपण खरोखर कोठे जात आहोत- जातीकडून वर्गाकडे की वर्गाकडून जातीकडे, तिसरे सत्रात विद्रोह, दहशतवाद व नक्षलवादाशी संघर्श – कारणे व आव्हाने, सत्र चवथे : ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था – शक्यता आणि आव्हाने, सत्र 5 : लोकसंख्येची अब्जावधीपर्यंतची वाढ – हम दो हमारे दो यशस्वी झाले काय?, सत्र 6 : यंग इंडिया… 2030 पयर्र्त भूक व दारिद्य्र निर्मूलन करु शकेल काय, सत्र 7 : भारत आणि उगवती जागतिक व्यवस्था, सत्र 8 : स्वातंत्र्योत्तर 7 दशकाच्या कालखंडात : भारत स्वत:ला कसा बघतो ? या सत्रांचा समावेश आहे. 29 राज्यातील 450 विद्यापीठातील 30 हजार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग, चाचणीद्वारे 10 हजार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी केले जाईल, 6 राज्यातील विधानसभा सभापती, देशातील 6 विद्यापिठांचे कुलगुरुंचा सहभाग, तरुण आमदारांचा सत्कार, आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार, उच्च शिक्षित युवा सरपंच सन्मान, गुरू सन्मान देण्यात येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या