Sunday, November 17, 2024
HomeनाशिकDindori Loksabha 2024 : भगरेंनी केली दिंडोरी 'सर'; तब्बल 'इतक्या' मतांनी मिळवला...

Dindori Loksabha 2024 : भगरेंनी केली दिंडोरी ‘सर’; तब्बल ‘इतक्या’ मतांनी मिळवला विजय

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha) मागील महिन्यात (दि.२० मे) रोजी मतदान झाले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.४ जून) रोजी सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील वेअर हाउसमध्ये या दोन्ही मतदारसंघांसाठी मतमोजणी सुरु होती. यानंतर आता मतमोजणीनंतर दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा निकाल जाहीर झाला आहे.

- Advertisement -

यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. त्यामुळे भगरेंनी दिंडोरीचा गड ‘सर’ केला आहे. भगरेंनी डॉ. भारती पवार यांचा तब्बल १ लाख १२ हजार मतांनी पराभव केला आहे. त्यामळे भगरे हे दिंडोरी लोकसभेतून विजयी झाले असून आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मविआचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत भगरे यांनी एकूण ५३८०७ मतांपैकी २३ हजार ४४३ इतकी मते मिळवत १ हजार मतांची आघाडी घेतली होती. तर पवार यांना पहिल्या फेरीत २२ हजार १८३ मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीत भगरे यांनी ६ हजार मतांची आघाडी घेतली होती.

याशिवाय सातव्या फेरीत भगरे हे पवार यांच्यापेक्षा १८ हजार ५०२ मतांनी आघाडीवर होते. भगरे यांना सातव्या फेरीत १ लाख ६८ हजार ९३९ मते मिळाली होती. तर भारती पवार (Bharati Pawar) यांना १ लाख ५० हजार ४३७ मते मिळाली होती. यानंतर आठव्या फेरीत भास्कर भगरे २३ हजार ६२७ मतांनी तर नवव्या फेरीत भास्कर भगरे २५ हजार मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर भगरे यांनी ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या