Tuesday, September 17, 2024
HomeनाशिकNashik Igatpuri News : भावली धरण ओव्हरफ्लो; तालुक्यातून समाधान व्यक्त

Nashik Igatpuri News : भावली धरण ओव्हरफ्लो; तालुक्यातून समाधान व्यक्त

घोटी | प्रतिनिधी | Ghoti

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भावली धरण (Bhavali Dam) प्रथम भरले आहे. जिल्ह्यातील पहिलेच धरण ओव्हरफ्लो झाल्याने आज चार वाजेपासून या धरणातून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. गेल्या वर्षीही २४ तारखेला भावली धरण भरले होते आणि यावर्षी देखील २४ ला ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात आले.

हे देखील वाचा : इगतपुरी तालुक्यात चोवीस तासात ‘इतक्या’ मिमी पाऊस; दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग

तालुक्यात अखंडपणे मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने या मुसळधार पावसाने तालुक्यातील सर्वच नदया नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे तालुक्यातील सर्वच धारणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, दारणा धरण समूहातील भावली धरण परिसरात विक्रमी पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणासह भाम आणि खापरी नदीचे पाणी दारणानदीतून मोठ्या प्रमाणात दारणा धरणात येत असल्याने दारणा धरणाच्या साठ्यातही कमालीची वाढ झाली असून दारणा धरणातून १८७४ क्यूसेसने विसर्ग करण्यात आला आहे. 

हे देखील वाचा : गंगापूर धरणात ‘इतके’ टक्के पाणीसाठा; जिल्ह्यातील इतर धरणांतील स्थिती मात्र चिंताजनक

दरम्यान दारणा धरणातही (Darna Dam) पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने या धरणातही ७७ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. तर या धरणातून आज पहिलाच विसर्ग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील मुकणे धरण व वाकी धरण मात्र याला अपवाद ठरले असून या धरणात केवळ अर्ध्यापेक्षा ही कमी टक्केवारी इतका अल्पसाठा झाला आहे. या धरणाला पाण्याचे स्त्रोत कमी असल्याने यावर्षीही हे धरण भरते की नाही अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे

भावली धरण ९६.५१ टक्के भरले

हे देखील वाचा : Nashik Bribe News : दीड लाखांची लाच मागितल्याप्रकरणी एटीएसचा पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात

तसेच तालुक्याची अमृतवाहिनी समजल्या जाणाऱ्या दारणा नदीच्या (Darna River) उगमस्थानी दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे भावली धरण काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागले. तालुक्यात अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने काल पासून चांगलाच जोर धरल्याने इतर धरणाच्या साठ्यातही भरीव वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील भावली, भाम, मुकणे, वैतरणा, दारणा, कडवा व वाकी या धरणसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या