Sunday, November 3, 2024
Homeनाशिकगंगापूर धरणात 'इतके' टक्के पाणीसाठा; जिल्ह्यातील इतर धरणांतील स्थिती मात्र चिंताजनक

गंगापूर धरणात ‘इतके’ टक्के पाणीसाठा; जिल्ह्यातील इतर धरणांतील स्थिती मात्र चिंताजनक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे बळीराजासह शहर वासीयांनीही समाधान व्यक्त केले आहे. मृत साठ्यापर्यंत तळ गाठलेल्या गंगापूर धरण (Gangapur Dam) साठ्यात त्यामुळे सुमारे पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी (दि.२३) सकाळी ६ वाजेपर्यंत गंगापूर धरणात ३६.८२ टक्के साठा असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले होते. त्यानंतर रात्रभर झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या गंगापूर धरणात ४२.२५ टक्के इतका पाणीसाठा असून धरण समूहात ३५.०५ टक्के साठा आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Rain Update : ‘या’ ९ जिल्ह्यांना IMD चा सतर्कतेचा इशारा; नाशिक, नगरमध्ये कसा असेल पाऊस?

तसेच जिल्ह्यातील (District) मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये एकूण २६.३२ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये एक ते दोन टक्क्यांनी पाण्याची पातळी वाढली आहे. तर मंगळवारी दिवसभरात शहरात २५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. यात घोटीला ९१ मिली मिटर, इगतपुरी १२३, त्र्यंबकेश्वर ८४, आंबोली ११२ मिली मिटर पाऊस पडल्याने नैसर्गिक नाल्यांमधून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे पर्यटकांची पाऊले त्र्यंबकेश्वर व इगतपुरीच्या दिशेने वळू लागले आहेत.

हे देखील वाचा : मंत्री भुसेंनी नाशिक-ठाणे महामार्गावरील रस्ते समस्यांचा घेतला आढावा

दरम्यान, या पावसामुळे (Rain) बळीराजाला दिलासा मिळाला असून, खरिप पिकालाही जीवदान मिळालेले आहे. दुष्काळग्रस्त येवला, नांदगाव, मालेगाव या तालुक्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पुढील २४ तासांत घाट माथ्यावरील भागासाठी हवामान विभागाने (IMD) ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. प्रत्यक्षात मागील दोन दिवसांपासून शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्याचे चित्र आहे.

हे देखील वाचा : Viral Video : घाटातील धुक्याचे विहंगम दृष्य

कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा ?

गंगापूर- ४२.२५ टक्के, कश्यपी – १७.२२ टक्के, गौतमी गोदावरी – ४२.५६ टक्के, आळंदी – ७.२३ टक्के, पालखेड – १४.२४ टक्के, करंजवण – २.२९ टक्के, वाघाड ११.०३ टक्के, दारणा – ७४.२६ टक्के, भावली- ९६.५१ टक्के, मुकणे- २२.५६ टक्के, वालदेवी- ३५.६६ टक्के, कडवा – ६३.४५ टक्के, नांदुर मध्यमेश्वर- १०० टक्के, चणकापूर ८.९८ टक्के, हरणबारी १४.०७ टक्के, केळझर ८.०४ टक्के, गिरणा ११.७५ टक्के, पुनद ४०.५८ टक्के तर उर्वरित धरणांत ० टक्के पाणीसाठा आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या