Friday, April 25, 2025
Homeनाशिकसातपूरला भवानी मातेच्या यात्रोत्सवास प्रारंभ

सातपूरला भवानी मातेच्या यात्रोत्सवास प्रारंभ

सातपूर । प्रतिनिधी Satpur

सातपूर गावातील भवानी मातेचा यात्रोत्सव फायर शो आणि फटाक्यांच्या आतषबाजीने मोठ्या उत्साहात पार पडला. गुढीपाडव्यानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत (अर्धनारीनटेश्वर) श्रीगणेशाने बारागाड्या ओढून सातपूर गावातील भवानी मातेच्या यात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला.बारा गाडया ओढण्याचा मान यावर्षी कैलास निगळ यांना देण्यात आला होता.

- Advertisement -

सुमारे 300 वर्षापासून सातपूर गावात भवानी मातेचा यात्रोत्सव गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा केला जातो. बारागाड्या ओढणाऱ्यास ‘श्रीगणेशा’ संबोधले जाते.रुढी आणि परंपरेनुसार या गणेशाचा मान निगळ घराण्याकडे आहे. हा गणेशा म्हणजेच अर्धनारीनटेश्वर होय.या गणेशाला साडीचोळी, पितांबर,फेटा,चाळ असा साज चढविला जातो. श्री व शक्ती एका रुपात पूजण्याचा अर्थात शिवपार्वती (अर्धनारीनटेश्वर) हे प्रतिकात्मक रुप अंगिकारले आहे.

आज सायंकाळी या श्रीगणेशाची गावातून मंगलवाद्यांच्या सुरात मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी सडा,रांगोळ्या काढून ठिकठिकाणी श्रीगणेशाचे औक्षण करीत स्वागत केले.

नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एकमेकांना बांधलेल्या बारागाड्यांचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आमदार सीमा हिरे रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. सातपूर औद्योगिक वसाहतीतील भवानी मातेचे दर्शन घेऊन आल्यानंतर बारा गाड्याना प्रदक्षिणा घालून श्रीगणेशाने या गाड्या ओढल्या. त्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला.

यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश निगळ भवानी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम निगळ, तसेच लक्ष्मण घाटोळ, गोकुळ निगळ शिवाजी भदूरे, सुनील मौले, शिवाजी मटाले, तानाजी नगर अजून, दिलीप भदूरे,दादा निगळ,काळू काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी सातपूर पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झाले होते.कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत,वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे, विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आज कुस्त्यांची दंगल
ईएसआय मैदाना लगत असताना पंचक्रोशीतील पैलवानांच्या माध्यमातून कुस्त्यांची दंगल रंगणार आहे या कुस्त्यांच्या लढतीसाठी उत्तर महाराष्ट्रातून पैलवान हजेरी लावत असतात.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...