Saturday, November 23, 2024
Homeभविष्यवेधग्रह क्षेत्रावरील चिन्हे शुभ अशुभ योग दाखवितात !

ग्रह क्षेत्रावरील चिन्हे शुभ अशुभ योग दाखवितात !

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

- Advertisement -

हातावरील ग्रहांचे क्षेत्र – हातावर आठ प्रकारच्या ग्रह उंचवट्यांना स्थान दिलेले आहे.

ग्रहांची स्थाने – हातावर व बोटांच्या खाली उंचवट्यांंवर कायम स्वरुपी स्थान असणारे ग्रह –

करंगळी – करंगळीच्या तिसर्‍या पेराखालील उंचवट्यावर बुध ग्रहाचे स्थान आहे.

तर्जनी – तर्जनीच्या तिसर्‍या पेराखालील उंचवट्यावर रवि ग्रहाचे स्थान आहे.

मध्यमा – मध्यमाच्या तिसर्‍या पेराच्या नंतर असलेल्या उंचवट्यावर शनि ग्रहाचे स्थान निश्चित केलेले आहे.

अनामिका – तीन पेरांच्या खालील उंचवट्यावर गुरु ग्रहाचे स्थान आहे.

शुक्र ग्रहाचा उंचवटा – आयुष्य रेषा गुरु ग्रहाच्या उंचवट्याखालील बाजूस किंवा उंचवट्यावरुन उगम पाऊन ती गोल घेरा घेत, मणिबंधाकडे जाते, या गोल घेर्‍याच्या आतील बाजूस असणार्‍या उंचवट्यावर शुक्र ग्रहाचे स्थान आहे.

खालचा मंगळ – आयुष्य रेषा व अंगठ्याच्या सुरुवाती- पासूनच्या भागापर्यंत खालच्या मंगळ उंचवट्यााला स्थान दिले आहे.

वरचा मंगळ – बुध ग्रहाखाली व हृदय रेषेच्या खालच्या भागास, वरच्या मंगळ उंचवट्याला स्थान दिले आहे. याची व्याप्ती मस्तकरेषेपर्यंत असते.

चंद्र – वरच्या मंगळाचे खालील बाजूस मस्तक रेषेच्या खाली मणिबंधापर्यंतचा उंचवट्यास चंद्रग्रहाच्या उंचवट्याला स्थान दिले आहे. हस्तसामुद्रिकांमध्ये या सात ग्रहांच्या अंमलाचा व प्रभावाचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो.

हस्तसामुद्रिक दृष्ट्या राहू व केतू हे छाया ग्रह कल्पिले असल्यामुळे त्यांचे अस्तित्व हस्तावर कोठे घ्यावे याबाबत विद्वांनामध्ये मतैक्य नाही. तसेच नेपच्यून हर्षल व प्लूटो ग्रहाबाबतही विद्वानांमध्ये त्यांचे स्थानाबद्दल मतैक्य नाही.

चिन्हांचे भाकीत, सर्वसाधारण निश्चित भाकीत मानण्यात येते. विविध चिन्हांचे भाकीत आयुष्यामानाचे मोजमाप करुन जातकाचे (चालू वय गृहीत धरुन) चिन्हांचे भाकीत वर्तविण्यात येते.

प्रभाव रेषेंच्या मिलनामुळे हातावर विविध चिन्हे येतात, विविध चिन्हे हातावरील त्या त्या वय वर्षातील चांगले वाईट योग दाखवितात. येथे महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मुख्य रेषेच्या संयोगाने होणारे विविध आकार वा चिन्हे या भागामध्ये मोडत नाहीत, त्यांचा कुठलाही वाईट अथवा चांगला प्रभाव पडत नाही, मात्र प्रभाव रेषेतून मुख्य रेषेशाी संपर्क वा स्वतंत्रपणे प्रभाव रेषेंनी बनलेली वविध आकाराच्या आकृत्या, ज्यांना आपण चिन्हे म्हणूयात, ती शुभ अशुभ फल देतात. हे योग हातावर चिन्ह रुपी असतात. प्रत्येक चिन्हांचे कारकत्व ग्रहानुसार बदलते. हे बदल शुभ अशुभ असतात, एखादे चिन्ह एखादया ग्रहावर नकारात्मक प्रभाव दाखविणारे असेल तर दुसर्‍या ग्रहावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. म्हणून प्रत्येक चिन्हाला शुभ अशुभ असे संबोधण्यापेक्षा, त्या त्या चिन्हाचे शुभ अशुभ फल प्रत्येक ग्रहानुसार काय येते ते बघूयात.

गुरु ग्रहावरील चिन्ह

फुली – स्पष्ट फुलीचे चिन्ह असेल तर विवाह उच्च कूळात व सौख्याचा होतो. हेच फुली चिन्ह अस्पष्ट असेल तर, डोक्यात खोक पडते, मोठी जखम होते. फुलीचे स्पष्ट चिन्ह गुरुच्या मध्यावर असेल तर तरुणपणी भाग्योदय, आयुष्य रेषेपाशी असेल तर कुमार अवस्थेमध्ये व तर्जनीच्या मुळाजवळ असेल तर, तरुणपण संपल्यानंतर मध्यमवयीन असताना भाग्योदय होतो.

यव – अहंकारी, भांडखोर, कूळाला कलंक असतो.

चौकोन – उत्साही, अभिमानी, महत्त्वाकांक्षी, ज्ञानी, सल्ले देण्याचे काम करतात.

त्रिकोण- अधिकार, धार्मिक, सात्विक, राजकारणात यश, एकंदरीतच सद्गुणी असतात.

नक्षत्र – गुरु उत्तम असेल यशस्वी, तर्जनीच्या मुळाजवळ अथवा हाताच्या बाहेर असेल तर, अशा व्यक्ति मोठ मोठ्या लोकांच्या संपर्कात असतील, विद्वान असतील तरीही तिला कुठलेली उच्चपद मिळत नाही.

जाळी – दूष्ट, निच, घमेंडी, चरित्रहिन, धर्मान्ध, अयशस्वी.कोळ्याच्या जाळीसारखे चिन्ह असेल तर धष्टपुष्ट ताकदवान, पाण्यात मृत्यू येण्याची शक्यता, तसेच तो भ्रष्ट असतो.

बिंदू- मानहानी, अपयश, दरिद्रता.

कोन- अभ्यासात हुशार, जबाबदार, पण गर्विष्ठ असतो.

शनि ग्रहावरील चिन्हे-

फुली – दुर्भाग्य, दूर्घटना, आजार होतात, ग्रहाच्या मध्य भागी चिन्ह असेल तर, तांत्रिक, धर्मान्ध असतो भाग्य रेषेवर फुली असेल तर दुर्घटनेत मृत्यू होतो.

चौकोन – घुभ असतो, दूर्घटनेत संरक्षण देते,

त्रिकोण – गुप्त-गुढ विद्येचा जाणकार व त्याची भाकीते खरी ठरतात. त्रिकोणासोबत नक्षत्रचिन्ह असेल तर वाईट काम करणारा तांत्रिक.

नक्षत्र – घानि उंचवटयावर बोटाच्या पेराजवळ असेल, अपघात, अपयघा, पक्षाघाताने मृत्यू किंवा आजार. नक्षत्र चिन्ह खंडीत किंवा अस्पष्ट असेल तर वृद्ध अवस्थेत आजारपण येते.

जाळी- दरिद्री, भाग्यहिन, व्यभिचारी, निराश, गुन्हेगार असतो.

गोल- दूसर्‍यांच्या वाईट प्रवृत्तीचा बळी ठरतो.

कोन- योगी, साधक, एकांंतवासी, संसारात रमत नाही.

यव- शनि व गुरुच्या बोटाचे तिसरे पेर यवयुक्त असेल तर जातक-यशस्वी, श्रीमंत, गुणी व सुखी असतो त्रिशूळ-गुणि, नितिवान, परोपकारी, धनी, सुखी, उदार असतो. त्रिशूलच्या रेषा खंडीत असतील तर शुभ प्रभाव कमी होतो.

रवि ग्रह

फुली- असफलता, निराशा, धनहानी, चुकीच्या निर्णयामुळे नुकसान जातक स्त्री असेल तर ती विष प्रयोग करु शकते, यांच्या नादी न लागणे उत्तम. रवि रेषा उत्तम असेल, तीला फुली चिन्ह स्पर्श करीत असेल तर, असा जातक सफल, धार्मिक असतो, रवि रेषा खराब असेल तर धर्मांध असतो.

चौकोन – खूप श्रीमंती असेल तरीही यांना त्याचा गर्व नसतो. असे जातक श्रेष्ठ कलाकार व आपल्या बुध्दीचा उपयोग व्यवसाय करण्यासाठी करतात.

नक्षत्र – रवि ग्रहाच्या सर्वोच्च स्थानी नक्षत्र असेल तर खूप मोठा मानसन्मान यांना मिळतो मात्र हे व्यक्तिगत जीवनात सुखी नसतात. रवि ग्रहाच्या आसपास नक्षत्र असेल तर मोठ्या लोकांत उठबस असूनही त्यांना सन्मान मिळत नाही, उच्चपद मिळत नाही. लोकप्रिय असतो. रवि बोटाच्या तिसर्‍या पेराजवळ नक्षत्र असेल तर शुभ फलदायी असते.

जाळी- कूटील, कारस्थानी, घमेंडी, प्रसिध्दीसाठी काही पण करणारा.

गोल – आंतरराष्ट्रीय मान सन्मान व सफलता, गोल चिन्ह अस्पष्ट व रवि रेषा खराब असेल तर म्हातारपणी नेत्र ज्योत क्षीण होत जाते.

बिंदू – अशुभ व मानसन्मान प्रतिष्ठा नष्ट होते.

कोन – श्रेष्ठ कवि, शिल्पकार, लेखक साहित्यिक, यश मानसन्मान मिळतो.

बुध ग्रहावरील चिन्हे

फुली – दिसायला साधा परन्तु अत्यंत बेईमान धोखेबाज, लबाड व फसविणारा असतो, त्यातच करंगळी वाकडी असेल तर, चोर, धोका देणार्‍या प्रवृत्तीत वाढ करतो. बुध ग्रहावर छोटे छोटे फुली चिन्ह असतिल व ग्रह निर्बली असेल तर असा जातक मंद बुध्दीचा व भयंकर आळशी असतो.

चौकोन- व्यवसायात नुकसानी पासून संरक्षण, स्वभाव स्थिर असतो.

यव – व्यवसाय, विज्ञान, कला, क्षेत्रात सफल होत नाही. असा जातक धुर्त, लबाड, फसविणारा असतो, विवाहबाह्र संंबंध ठेवणारा असतो.

त्रिकोण – राजकारण व व्यवसायात यशस्वी, कुशल, विद्वान, श्रीमंत, साहसी, तल्लख बुध्दीचा, वक्तृत्व कलेत निपूण, परन्तु राजभय व शत्रुभय यांना जास्त असते.

नक्षत्र – अत्यंत विद्वान, व्यवसायात यशस्वी, हातावर शुभ लक्षणे असतील तर सद्गुणी अशुभ लक्षणे असतील तर जातकाला बेईमान व चोर बनवितात.

जाळी – बेईमान, अस्थिर बुध्दी, अविवेकी, जातकाच्या. हातावर अन्य अशुभ लक्षणे असल्यास जेलची यात्रा करणारा व संंबंधामधील स्त्रीशी अनैतिक संंबंध ठेवणारा असतो.

गोल – विषबाधा, हृदयविकार, आकस्मात मृत्यू. असे जातक, अविश्वासू, धूर्त, कूटील कारस्थानी असतात.

बिंदू- व्यवसायात नुकसान. बिंदू जेवढा मोठा तेवढा जातक बेईमान, धूर्त, विश्वासघातकी, चोर लफंगा.

कोन – व्यवसाय व कला क्षेत्रात यश, समकोण असेल तर संपत्ति राखून ठेवणारा, न्यून कोण असेल खर्चिक, संपत्तीची विल्हेवाट लावणारा.

शुक्र ग्रहावरील चिन्हे

फुली – प्रेम प्रकरणामुळे अनेक समस्या उदभवणारा, प्रेमात निराशा मिळते. आयुष्य रेषेजवळ छोटी फुली असेल तर, जवळच्यांच्या प्रेमामध्ये बाधा येते.

चौकान – चिन्ह असेल तर जातक अधिक कामूक असतो, प्रेमसंबंधातून सुध्दा संकटे येत नाहीत, अब्रू राखली जाते. चौकोन चिन्हा सोबत, यव चिन्ह असेल तर मुला-बाळापासून अपमानित होतो. चौकोन चिन्ह आयुष्य रेषेला स्वतंत्रपणे चिकटून असेल जेल यात्रा होतो. किंवा एकांतवास भोगावा लागतो.

यव – वियोगाचे दू:ख सहन करावे लागते, प्रेमभंग होतो.

त्रिकोण चिन्ह असेल तर, जातक प्रेम संबंधात संयमी असतो. उंचवटा विकसित, मध्य भागात नक्षत्र चिन्ह असेल तर प्रेम संबंधात यश मिळते. अनेक छोटी नक्षत्र चिन्हे असतील तर प्रियजनांचे मृत्यू/वियोगाचे कारण बनते.

जाळी – चिन्ह असेल तर जातक कामूक, कपटी, वासना शमविण्यासाठी तत्पर, यातच शुक्र क्षेत्र चपटा, फोफसा असेल तर अत्यंतिक व्यभिचारी असतो.

गोल – असेल तर जातकाला कायमस्वरुपी रोगी रहावे लागते. तीळ – चिन्ह असेल तर, मासिक पाळी व त्या संंबधी त्रास असतात.

विकसित शुक्र उंचवट्यावर

त्रिकोण – असेल तर जातक चित्रकार असतो. परस्त्रीच्या प्रेमात गुंतण्याचा संभव असतो.

खालच्या मंगळ व शुक्र उंचवटयाच्या सिमेवर मध्यभागी डाग असेल तर, अत्यंत कामासक्त, वाईट रोगांनी ग्रस्त होतो.

चंद्र ग्रह

फुली – चंद्र उंचवट्यावर सर्व ठिकाणी फुली चिन्ह अशुभ असते, चंद्र उंचवट्यावर फुली चिन्ह मस्तक रेषेच्या खाली असेल तर जातक अव्यवहारी, अस्थिर मनाचा व रोगिष्ट असतो. पाण्यात बुडण्याचा धोका असतो.

चौकोन – चिन्ह असेल तर जातक व्यवहारी असतो, पाण्याची भिती त्याला रहात नाही. त्यापासून रक्षण होते.

यवचिन्ह – कल्पना शक्तीचा र्‍हास करते, अशूभ फल देते.

त्रिकोण – कल्पनाशक्ती वाढविते, त्या योगे यश मिळविते तसेच चंद्र उंचवटा मणिबंधापाशी फुगीर झाला असेल तर गुढ विद्येत प्रगती होते. पाण्यात बुडण्याची भिती, मनगटाच्या जवळ खालच्या भागात असेल तर, जलोधर रोगाचा संभव, वरच्या भागात असेल तर, आतडयाचे विकार होतात,

जाळी – असेल तर, अस्थिर, अशांत, चंचल, भाग्यहीन असतो. स्त्रीच्या हातावर हे चिन्ह असेल तर ती व्यभिचारी असते, तथा हिस्टेरीयाचे झटके येतात.

गोल – पाण्यात बूडून मृत्यूचा धोका, हे चिन्ह पूर्ण नसेल तर बुध्दी अस्थिर असते.

तीळ – स्थायूचे विकार, मेंदू संबंधी रोग होतात.

नक्षत्र – स्वतंत्र असेल तर जातक दयाळू, विश्वसनीय, धनाढ्य व परोपकारी असतो.

मंगळ ग्रह

फुली – वरच्या मंगळ उंचवट्यावर आडव्या रेषा वा फुली चिन्ह असेल तर अनेक शत्रू असतात. खालच्या मंगळ उंचवटयावर फुली चिन्ह असेल तर शत्रु त्या व्यक्तिवर प्राणघातक हल्ला करतात, तो स्वत: भांडकूदळ असतो. वरच्या मंगळ उंचवटा अधिक फुगीर असेल तर जातक, क्रोधी असतो, पिचपिचा असेल तर प्राणघातकपणात अजून भर पडते.

चौकोन – मगंळ ग्रहावर चौकोन चिन्ह असेल तर प्राणघातक हल्यातून बचाव होतो. चौकोन चिन्ह मंगळ उंचवटयावर शुभ असते.

यव – असेल तर, शाारीरीक व मानसिक दूर्बलता असते.

त्रिकोण- चिन्ह असेल तर साहसी, लढवय्या युध्दकलेत प्रविण असतो.

नक्षत्र – वरच्या मंगळ उंचवट्यावर हे चिन्ह असेल व्यक्ति धैर्यवान व स्वकष्टाने सफल होते. उंचवटा अधिक फुगिर असेल तर आक्रमक असतेे. खालच्या मंगळ उंचवट्यावर नक्षत्र चिन्ह असेल तर सैनिकी क्षेत्रात विरता पूरस्कार मिळतो, त्यात मान-सन्मान मिळतो.

जाळी- मंगळ उंचवटयावर चिन्ह असेल तर, जखमी होऊन रक्तस्त्राव होतो. दोन्ही उंचवटे अधिक फुगीर वर उन्नत असतील तर क्रोधी निर्लज्ज, स्वार्थी लबाड असतो. वरच्या मंगळ उंचवट्यावर जाळी चिन्ह असेल तर आकस्मित मृत्यू होतो, अथवा आत्महत्तेला प्रवृत्त होतो.

गोल – कोणत्याही मंगळ उंचवटयावर हे चिन्ह अशुभ असते, डोळयाला जखम होण्याचा संभव असतो.

तीळ – कोणत्याही मंगळ उंचवट्यावर तिळ असेल तर शारीरिक इजा होते व स्थावर जंगम रहात नाही. छोटा मोठा डाग असला तरी नमूद घटनेचा संभव असतो, तसेच प्रत्येक क्षेत्रात असफलता येते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या