Tuesday, September 17, 2024
Homeभविष्यवेधआर्थिक सहकार्याची शक्यता

आर्थिक सहकार्याची शक्यता

जुलै – 2020

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या षष्ठस्थानी केतू-गुरू-प्लुटो सप्तमात शनी, अष्टमात नेपच्यून, नवमात मंगळ, दशमात हर्षल, लाभात शुक्र व्ययात रवि, बुध-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो अशी आहेत. राशी चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी चंद्र, तत्त्च – जल, चर राशी असल्याने स्वभाव चंचल. उत्तर दिशा फायद्याची आहे. सत्त्व गुणी, वर्ण- ब्रह्म, स्वभाव – सौम्य, कफ प्रकृती, राशीचा अंमल छातीवर आहे. शुभ रत्न – मोती, शुभ रंग – पांढरा किंवा क्रिम. शुभ दिन – सोमवार. शंकराची उपासना फायद्याची आहे. शुभ अंक – 2,

शुभ तारखा – 2, 11, 20, 29. मित्रराशी – वृश्चिक, मीन,तुला. शत्रुराशी – मेष, सिंह, धनू, मिथुन. मकर, कुंभ. अध्ययनाची आवड. जलप्रिय. भावनाप्रधान. कुशल प्रबंधक. कल्पनाशील योजना तयार करण्यात प्रवीण. प्रामाणिक, भावूक. विचारी. परोपकारी. ईश्वरप्राप्तीमध्ये रस.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावळा राहील. शंकराची उपासना केल्यास या दोषावर नियंत्रण राहील. पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीसाठी विचारणा होण्याची शक्यता.

स्त्रियांसाठी – ग्रहांची चौकट महिलांसाठी चांगली आहे. फॅशनची नवीन वस्त्रे व अलंकार खरेदी यासंबंधी मनासारख्या गोष्टी घडतील. त्यासाठी पतिराजांची उत्तम साथ मिळेल. मुलांंवर नियंत्रण ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण राहील. परीक्षा देणे जास्त अवघड जाणार नाही. या महिन्यात लेखनाचा सराव जेवढा वाढवाल तेवढ्या प्रमाणात टक्केवारी वाढेल.

शुभ तारखा – 2, 5, 7, 9, 10,12, 13, 14, 21, 25, 26, 29.

ऑगस्ट – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध, द्वितीयात रवि, षष्ठात गुरू-केतू-प्लूटो, सप्तममात शनी, अष्टमात नेपच्यून, नवमात मंगळ, दशमात हर्षल, व्ययात शुक्र- राहू अशी ग्रहस्थिती आहे.

द्वितीयात रवि आहे. त्यामुळे वडील मंडळीकडून आर्थिक सहकार्याची शक्यता निर्माण करीत आहे. खर्चिक व उदार स्वभावाला अंकुश लावावा अन्यथा कर्जाचा विचार करावा लागेल. पूर्वार्ध चांगला आहे. कर्जापासून शक्यतो दूर रहा. कर्ज घेतले असल्यास वेळेवर हप्ते भरण्याची काळजी घ्या. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्या. कुटुंबासाठी बरीच दगदग होण्याची शक्यता आहे.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखदायक घडतील. त्यातून आर्थिक लाभ होतील. विद्याव्यासंगात भर पडेल. मित्रमंडळींशी मिळून मिसळून वागाल. चेहर्‍यावर प्रसन्नता झळकत राहील. अडीअडचणीच्या वेळी मित्रांच्या मदतीला धावून जाल. स्वधर्मावर चांगली श्रद्धा राहील. रवि-शुक्र जिरेकादश योग आहे.

या शुभयोगामुळे सरकारी, निमसरकारी सहकारी संस्थातून नोकरी करणार्‍यांना उन्नतीकारक असा महिना आहे.

स्त्रियांसाठी – द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला, म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात प्रगती साधाल. आळस टाळावा. गेलेली वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा – 2, 3, 4, 5, 7, 8, 11, 13, 15, 20, 21, 22, 23, 25, 28, 30, 31

सप्टेंबर – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शुक्र द्वितीयात रवि, तृतीयात बुध, षष्ठात गुरू – प्लुटो-केतू, सप्तमात शनी, अष्टमात नेपच्यून, दशमात मंगळ-हर्षल व्ययात राहू अशी ग्रहस्थिती आहे..

षष्ठात गुरू आहे. हा गुरू चांगला नाही असे समजले जाते. शत्रू जिंकण्याची शक्यता असते. मात्र वैद्यकीय व्यवसायाला हा गुरू पोषक आहे. सार्वजनिक प्रश्नांची चर्चा करणे आवडेल. नोकरवर्गाला हा गुरू विशेष चांगला आहे. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची शक्यता आहे. किंवा इच्छितस्थळी बदली होण्याची शक्यता आहे. प्रकृती निरोगी राहील. मात्र पचनाच्या तक्रारी चालू राहतील.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तिमत्त्वाला झळाळी येईल. हौशी व रंगेल स्वभावाची त्यात भर पडेल. नेहमी कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याबद्दल प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम लवकर आत्मसात करून त्यापासून धनप्राप्ती करू शकाल.

स्त्रियांसाठी – लग्नी शुक्र आहे. महिलांसाठी सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुद्धिमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात चांगली प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनांत जास्त रस वाटेल. काहींना धाडसी प्रकारच्या खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 2, 3, 4, 6, 7, 10, 13, 14, 18, 24, 25, 26, 28, 29, 30.

- Advertisment -

ताज्या बातम्या