Wednesday, March 26, 2025
Homeक्राईमसुरगाणा गटविकास अधिकारी २ लाख १० हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या जाळ्यात

सुरगाणा गटविकास अधिकारी २ लाख १० हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या जाळ्यात

सुरगाणा| प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत दोन कोटी 32 लाख 30 हजार रुपये बिल काढण्याच्या मोबदल्यात दोन लाख दहा हजारांची लाच स्वीकारताना सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश गोकुळ पोतदार यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यामुळे खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करत असून, तक्रारदार यांचे दोन कोटी 32 लाख 30 हजार 27 रुपये बिल काढण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे दोन लाख 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे पथकाने सापळा रचला असता तक्रारदार यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले .

- Advertisement -

पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, किरण धुळे, पोलीस नाईक विलास निकम, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Snehal Jagtap : स्नेहल जगताप यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला अखेर जय महाराष्ट्र;...

0
मुंबई । Mumbai कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. ही गळती थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणतीही पावले उचलण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. आता...