सौ. वंदना अनिल दिवाणे
3 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरू, मंगळ या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास कन्या आहे. लहानपणापासून काही तरी दिव्य करावे अशी तुमची महत्त्वाकांक्षा राहील. प्राप्त परिस्थितीतून उच्च दर्जा गाठण्यासाठी सतत कार्यरत रहाल. कोणतेही पद प्राप्त झाले तरी मनाचे समाधान मुळीच होणार नाही. लगेच पुढील लक्ष निर्धारित कराल. या गडबडीत दुर्लक्ष झाल्यामुळे अचानक काहींना आजार होण्याचा धोका आहे. खरे म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. पण कितीही पैसा मिळाला तरी मनाचे समाधान होणार नाही. उगीच चिंता व धडपड कराल.
4 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, सूर्य, हर्षल, या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. हर्शल ग्रहाच्या प्रभावामुळे स्वभावात काहीसा विचित्रपणा निर्माण होईल. कल्पना मौलिक असल्याने इतरांपेक्षा स्वतंत्र आणि मौलिक असतील. प्रगतीसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागेल. त्यामुळे मानसिक त्रास वाढेल. कारण इतरांशी लवकर मैत्री करणे किंवा जमवून घेणे मुळीच जमणार नाही. त्यामुळे इतरांकडून कामात सहकार्य मिळणे कठीण जाईल. आर्थिक बाबतीत इतरांचे सहकार्य घेण्याचे प्रयत्न केल्यास प्रचंड फसवणूक होण्याची शक्यता आहे. पण एकट्याने स्वबुद्धीने अर्थार्जन प्राप्तीचा प्रयत्न केल्यास उत्तम यश मिळेल.
5 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. बुधाच्या प्रभावामुळे कोणत्याही व्यक्तीशी आणि कोणत्याही परिस्थितीशी हातमिळवणी करण्यात हातखंडा राहील. कोणत्याही करिअरचा स्वीकार केल्यास त्यात उत्तम यश मिळवू शकाल. त्याबरोबरच कोणत्याही विषयात प्राविण्य मिळविण्याची बुद्धिमत्ता जवळ असल्याने एकाच वेळी अनेक उद्योग करण्याची प्रबळ इच्छा राहील. तसे केल्यास फार धावपळ आणि फजिती होईल. आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रापैकी एक किंवा दोन निवडून त्यावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम प्रगती होईल. कोणत्याही करिअरमध्ये यश मिळणार असल्यामुळे अर्थप्राप्ती करणे जड जाणार नाही. शिवाय भाग्याची साथ मिळाल्यामुळे दुधात साखर पडल्यासारखे होईल.
6 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. सर्वांविषयी सहानूभुती वाटेल. कुटूंबातील लोक आणि नातेवाईक यांच्याशीही जमवून घेता येणार नाही. विवाहानंतर तुमचे जीवन योग्य दिशेने प्रवास करेल. ईश्वरावर पूर्ण श्रद्धा असल्याने धार्मिक कार्याकडे विशेष लक्ष राहील. आर्थिक प्राप्तीच्या बाबतीत फार भाग्यवान आहात. मित्रमंडळीकडून ऐनवेळी हवी तशी हवी तेवढी आर्थिक मदत मिळत राहील.
7 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, बुध,चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. तुमचे विचार उच्च पातळीचे असतात. कल्पनाशक्ती चांगली आहे. असे असूनही एक सांसारिक सुख उपलब्ध असावे असे तुम्हाला वाटते. गूढशास्त्राचे तुम्हाला विशेष आकर्षण आहे. पण त्यावर मनापासून विश्वास असणार नाही. अनेक प्रश्न विचारून मग तुम्ही तुमचे मत आणि एकदा समाधान झाले की, मग सर्व शक्तीनिशी त्या कामात झोकून द्याल. संशोधनाच्या कामाची फार आवड राहील. मनोविकारासंबंधी खोलवर अभ्यास कराल. आयुष्याच्या पूर्वार्धात इच्छेप्रमाणे भौतिक सुख सुविधा कदाचित कमी प्रमाणात उपलब्ध होतील. पण उत्तरार्धात तुम्हाला पैसा, प्रतिष्ठा भरभरून यश मिळेल. आर्थिक बाबतीत चिंता करत रहाण्याची सवय आहे. आर्थिक बाबतीत अनेक संधी उपलब्ध होतील..
8 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. तुमच्या मताविषयी विशेष आग्रही राहणार नाही. वयाच्या 35 वर्षांपर्यत अशाप्रकारे दडपण झुगारून देऊन आपल स्वतंत्र विचाराप्रमाणे काम करू शकाल. आणि आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. स्वभाव गंभीर आहे. आणि इतरांपेक्षा वेगळ्या विषयांचा एकांतात बसून खोलवर अभ्यास करणे फार आवडते. दुसर्याच्या विषयात सहमत होणे तुम्हाला जमणार नाही. कारण स्वभावात अति चिकीत्सककपणा व टिका करण्याची तुमची सवय राहील. आर्थिक बाबतीत शनीच्या प्रभावामुळे अति सावधानता असल्यामुळे पैसा मिळवण्याच्या चालून आलेल्या अनेक चांगल्या संधी निघून जातील. नंतर तुम्ही बैल गेला आणि झोपाही गेला असा विचार करून नुसते हळहळत बसाल मात्र तुम्ही आपली गुंतवणूक सुरक्षित व्यानार जसे कोळशाच्या खाणी, जमीन व घरे इ.मध्ये गुंतवणूक कराल व त्यातून उत्तम आर्थिक उत्पन्न येईल.
9 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. मत प्रकट करतांना गुळगुळीतपणाचे धोरण स्वीकार कराल. मंगळ आणि बुधाच्या एकत्रितपणामुळे तुमचा रिस्क घेण्याकडे कल राहील. बोलण्यात खोचकपणा असण्याची शक्यता आहे. त्याचे कारण चिकीत्सक वृत्ती, सूक्ष्म निरीक्षण ज्यामुळे लहान लहान घटनांनीही रागाचा पारा लगेच वर चढेल. औद्यागिक संस्थामधून उपजिवीकेचे साधन प्राप्त होईल. यांत्रिक उपकरणांचा उपयोग फायद्याचा राहील. वैज्ञानिक उपकरणांच्या बाबतीत बरेच कुतूहल राहील. अध्यात्म किंवा धार्मिक गोष्टींबद्दल आकर्षण वाटेल. आर्थिक बाबतीत चांगले यश मिळेल. मौलिक विचारातून केलेल्या कामामुळे बराच पैसा हाताशी लागेल.