किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे
29 ऑक्टोबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, मंगळ, शनीग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. अगोदरच स्वप्नांमुळे अथवा अन्य मार्गामुळे सूचना मिळत राहतील. वैयक्तिक बाबतीत कोणताही निर्णय दुसर्याच्या आधारावर घेऊ नये. स्वतः एकांतात विचार करून घेतलेल्या निर्णयाने तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होईल.
30 ऑक्टोबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, मंगळ, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. गुरूसारख्या अत्यंत शुभ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे महत्त्वाकांक्षा मोठी राहील. सामान्य करिअरमध्ये समाधान होणार नाही. त्यामुळे लक्ष्य नेहमी उच्चपद असेल. मोठ मोठ्या कामाची जबाबदारी अंगावर घेऊन ती तुम्ही नीटपणे पूर्ण कराल. तुमची वृत्ती न्यायशील असून स्वभाव अत्यंत दयाळू आहे. आर्थिक बाबतीत भाग्याची साथ उत्तम मिळेल.
31 ऑक्टोबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. बुद्धीमत्ता अतिशय चांगली असून व्यवस्थापनाच्या कामात भरपूर यश मिळेल. धूर्तपणाद्वारे काम करून घेताना इतरांविषयी शंका वाटतील. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवणार नाहीत. सौंदर्याचे वेड असेल. कलाक्षेत्रात सहज यश मिळेल. धनप्राप्तीच्या बाबतीत जास्त भाग्यवान आहात.
1 नोव्हेेंबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, सूर्य, हर्शल या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. त्यामुळे क्रियाशीलता प्रचंड राहिल. केवळ स्वतःचेच नव्हे तर अनेकांचे संसार चालावेत असा तुमचा उद्योग असेल. राजकारणात भाग घेतल्यास विशेष यश प्राप्त होईल. आर्थिक बाबतीत जीवनात तुम्हाला उत्तम यश मिळेल. पैसा मिळवण्यापेक्षा तो टिकवणे जड जाण्याची शक्यता आहे.
2 नोव्हेेंबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. तुमच्यावर प्रभाव टाकणारा चंद्र स्वतःच कमजोर असल्यामुळे स्वभावात बराच विरोधाभास आहे. निर्णय घेण्याच्या बाबतीत तळ्यात मळ्यात करता निश्चीत निर्णय घेण्याची सवय लावल्यास जीवनात निश्चीत यश मिळू शकेल. करिअरच्या बाबतीत ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. अन्यथा जीवन भरकटत जाईल. आर्थिक बाबतीत विशेष काळजी न घेतल्यास त्याविषयी तुम्हाला सतत चिंता वाटत राहील. इस्टेट आणि पैसा दोन्ही बाबतीत स्थिती नेहमी वर खाली होत राहील.
3 नोव्हेेंबर-
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, मंगळ ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. या ग्रहांची चौकट यश व महत्त्व मिळवून देईल. आत्मविश्वास फार दांडगा आहे. आपण करतो ते योग्य अशी तुम्हाला खात्री आहे. यामुळे जबाबदारीची कामे यशस्वीरित्या पार पाडू शकता. सुरूवातीच्या काळात अनेक अडथळे येतील पण हळुहळु ते सव पार करून तुम्ही पुढे जाल. कोणत्याही कामात धनप्राप्ती होण्याची शाश्वती.
4 नोव्हेेंबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य हर्षल, मंगळ ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. हर्शल आणि मंगळ यांच्या एकत्रित प्रभावामुळे आपले जीवन इतरांपेक्षा वेगळ्या वळणावर नेऊन यशस्वी व्हाल. विशेषतः संशोधनाच्या कामात तुम्हाला चांगले यश मिळेल. पण दुर्दैवाने कुसंगतीत पडल्यास वाईट मार्गाला लागण्याची शक्यता आहे. मौलिक कल्पनांतून विपुल धनप्राप्ती होईल.