Tuesday, November 26, 2024
Homeभविष्यवेधजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

किरोच्या नजरेतून – सौ. वंदना अनिल दिवाणे

5 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, मंगळ, ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. बुद्धीमत्ता तीक्ष्ण असून व्यवस्थापनाच्या कामात भरपूर यश मिळेल. धूर्तपणाद्वारे काम करून घेतांना इतरांविषयी शंका वाटत राहील. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवणार नाही. सौंदर्याचे वेड असेल. त्यामुळे कलाक्षेत्रात सहज यश मिळेल. धनप्राप्तीच्या बाबतीत जास्तच भाग्यवान आहात.

- Advertisement -

6 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. इतरांच्या मदतीला अंतस्फूर्तीने धावून जाता. त्यासाठी थोडे फार नुकसान झालेलेही चालते. सुरूवातीचे आयुष्य त्रासात जाईल. एखाद्या विषयाची रूची निर्माण झाली की, ती दुसर्‍याने कितीही विरोध केला तर सोडणार नाही. संपर्कात येणारे लोक तुमच्या प्रभावाने दिपून जातील. कलाक्षेत्राविषयी जास्त आपुलकी वाटेल. चित्रकला व संगीत याविषयीही आकर्षण वाटेल. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. स्वतःच्या मनाप्रमाणे व्यवस्थापन केले तर फायदा होईल. धनसंग्रह करण्यात यशस्वी व्हाल.

7 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. नेपच्यून ग्रहाचे प्रभुत्व बुद्धीवर असून सांसारिक गोष्टींवर नाही. त्यामुळे दैवी शक्तीचा साक्षात्कार होऊन स्वप्न किंवा अन्य मार्गाने भावी घटनांची चाहूल लागेल. अत्यंत संवेदनशील असल्याने भोवताली असलेल्या लोकांच्या वातावरणाचा फार परिणाम होईल. अशी परिस्थिती जर चांगली नसेल तर तुम्ही बेचैन व्हाल. विज्ञानाद्वारे उत्तम प्रगती होऊ शकते. नवीन संशोधनात चांगले यश मिळेल. पैसा मिळवण्याचे आकर्षण नसले तरी अनेक प्रकारच्या उद्योगातून पैसा मिळत राहील. तेवढेच नव्हे तर वारसाहक्क, बक्षिस, संशोधनातून अशा इतरांना न येणार्‍या कामातून पैसा मिळेल.

8 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. शनि व मंगळ ग्रहाचे एकत्र येणे त्रासदायक ठरू शकते. शनी न्यायाधीश असल्यामुळे तो अर्थप्राप्तीचे मार्ग अवैध असल्यास गोत्यात आणू शकतो. अध्यात्माच्या बाबतीत मात्र उत्तम प्रगती होईल. आत्मसंयमनाच्या दृष्टीने या दोन ग्रहांची युती चांगली आहे. स्वतःवर नियंत्रण करणे तुम्हाला चांगले जमेल. आणि स्वतःवर विजय मिळवणे हाच खरा विजय होय. अर्थिक बाबतीत तुम्ही जसे ठरवाल तसे होईल. मनात आले तर धनवान व्हाल.

9 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. मंगळाल ंअंगारक म्हणतात. सर्व कृतीच्या पाठीमागे हा अग्नी नेहमी प्रज्वलित असेल. तुमच्या यशामुळे अनेक शत्रु निर्माण होतील. जिवीताला धोका असल्याने सदैव सावध रहा. सकारात्मक दृष्टीकोन असल्यामुळे अने विधायक कार्य पार पाडतील. प्रबळ इच्छाशक्तीमुळे अशा कार्यात तुम्हाला सहज यश मिळेल. मातीचे सोने करण्याची कला अवगत असल्याने कोणत्याही कार्यक्षेत्रात विपुल धनप्राप्ती होईल.

10 नोव्हेेंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, हर्षल, मंगळ ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. तुम्हाला मौलिकतेची देणगी प्राप्त झाल्यामुळे प्रयत्न केल्यास साहित्य, नाटक, प्रसारक म्हणून उत्तम यश मिळू शकेल. रंगभूमीवरील कोणत्याही प्रकारचे काम करणे फायद्याचे आहे. मौलिकतेमुळे तुमच्या कार्याला जनमानसाचा चांगला प्रतिसाद मिळाला तर प्रसिद्धीचा झोत तुमच्यावर राहील. आर्थिक बाबतीत जीवनात उत्तम यश मिळेल. मात्र मिळवलेला पैसा टिकवणे जड जाईल.

11 नोव्हेेंबर -वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, मंगळ ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. मनावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. घेतलेल्या निर्णयात वारंवार बदल करणे तोटा होण्याचा संभव आहे. कोणत्या कार्यक्षेत्रात काम करावेे हा निर्णय घेण्याच्या बाबतीत तळ्यात मळ्यात चालू राहील. घेतलेल्या निर्णयात बदल करू नये. कल्पनाशक्ती चांगली असल्यामुळे कलेच्या क्षेत्रात चांगले यश मिळेल. आर्थिक बाबतीत विशेष सतर्क राहणे आवश्यक आहे. विवाहाने किंवा वारसाहक्काने मिळालेली संपत्ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या