सौ. वंदना अनिल दिवाणे
नोव्हेंबर – 2020
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, द्वितीयात गुरु- प्लूटो, तृतीयात शनि, चतुर्थात नेपच्यून, पंचमात मंगळ, षष्ठात हर्षल, सप्तमात राहू, लाभात शुक्र, व्ययात रवि-बुध अशी ग्रहस्थिती आहे.
तुमची रास – तो, ना,नी,नू,ने,नो,या,यी,यू अशी आहेत. राशीचे चिन्ह विंचू आहे. राशी स्वामी मंगळ आहे. उत्तर दिशा फायद्याची. राशीचे लिंग स्त्री. म्हणून स्वभाव सौम्य, वर्ण-ब्राह्मण, कफ प्रकृती. पाठीसंबंधी विकाराची काळजी घ्यावी. शुभ रत्न पोवळे, शुभ रंग लाल, शुभ वार मंगळवार, देवता- शिव,हनुमान, भैरव. शुभ अंक-5,
शुभ तारखा-8,18,19. मित्र राशी- कर्क व मीन, शत्रु राशी- मेष, सिंह, धनु. क्षमा करणार नाही. सूड घेण्याची वृत्ती. शत्रूवर तुटून पडाल. मात्र प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी. रसायने, औषधी, व डॉक्टर्ससाठी चांगली रास. दृढप्रतिज्ञा, साहसी कर्मठ व स्पष्टवादी.
पंचमात मंगळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. मित्रसुख कमी. मुलाविषयी चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुर्खांची संगत टाळावी. ऐशोरामासाठी वृत्ती राहील. सट्टयासारख्या व्यवहारापासून दूर रहा. जवळपास प्रवास घडण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्राची आवड असलेल्यांना खेळात प्रगती होऊन पुढे जाण्याची संधी मिळेल. केमिकल्स, प्राणीशास्त्र, भूगर्भशास्त्र, वैद्यकीय व शास्त्रीय विषयाशी संबंधित काम करणार्या लोकांची प्रगती होईल.
स्त्रियांसाठी – उपवर कन्यांचे सहज विवाह जुळतील. जावई सज्जन व सुसंस्कृत घराण्यातील मिळतील. विवाहीत स्त्रियांना कौटुंबिक सुख उत्तम राहील. काटकसर केल्यास आर्थिक अडचणी येणार नाहीत.
विद्यार्थ्यांसाठी – पंचमातील गुरू धनस्थानी आहे. विदयार्थी अध्ययनात विशेष प्रगती करू शकतील मात्र आळस झाडून नियमीतपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे लक्षात ठेवा.
शुभ तारखा -4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30
डिसेंबर- 2020
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, द्वितीयात गुरू-प्लुटो, तृतीयात शनि, चतुर्थात नेपच्यून, पंचमात मंगळ, षष्ठात हर्शल, सप्तमात राहू, लाभात शुक्र, व्ययात रवि-बुध अशी ग्रहस्थिती आहे.
द्वितीयात गुरू स्थानामुळे विद्ववत्तेबद्दल नावलौकीक होईल. अभ्यास केल्यास वक्तृत्त्वात विशेष यश मिळेल. केवळ शब्दाने लोकांवर चांगली हुकूमत गाजवता येईल. राजकारणी लोकांना याचा चांगला फायदा होईल. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात होईल. सुग्रास भोजन प्राप्त होईल. द्वितीयात गुरू असणे हा भाग्यवृद्धीचा स्वतंत्र योग आहे. नेहमी आनंदी वृत्ती राहील. कौटुंबिक सुख प्राप्त होईल. स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल.
तृतीयात शनि आहे. शत्रुपक्षामध्ये फाटाफूट पाडून त्यांच्यावर मात करण्यात यश मिळेल. अकल्पित भाग्योदय होण्याचे योग. सरकार दरबारी वजन वाढेल. पुत्राचेे सुख उत्तम राहील. आहार सिमीत पण समतोल राहील. कामात एकाग्रता साध्य होईल. बौद्धिक कामात विशेष प्रगती होईल. पत्नीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
सप्तमात राहू आहे. विवाहोत्सुक तरूणांचे विवाह जुळतील. भावी पत्नी सुंदर असेल. विवाहानंतर वैवाहिक जीवनात अडचणी येऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागेल. कामानिमीत्त प्रवास घडण्याचे योग आहे . प्रवासातून लाभ होतील.
स्त्रियांसाठी – व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.
विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थीदशा हा जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.
शुभ तारखा – 4, 5, 8, 12,13, 14,16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30
जानेवारी- 2021
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, धनस्थानी रवि-शुक्र-नेपच्यून, तृतीयात बुध-गुरू- शनि, चतुर्थात नेपच्यून , षष्ठात मंगळ-हर्षल, सप्तमात राहू, अशी ग्रहस्थिती आहे.
द्वितीयस्थानी रवि आहे. वडीलमंडळीकडून आर्थिक सहकार्याची शक्यता निर्माण करीत आहे. उदार व खर्चिक स्वभावाला लगाम लावा. अन्यथा कर्जाचा विचार करावा लागेल. पूर्वाध चांगला आहे. कर्जापासून दूरच रहा. कर्ज घेतले असेल तर शक्यतो वेळेवर हप्ते भरा. कुटुंबासाठी बरीच दगदग होण्याची शक्यता आहे.
तृतीयात बुध आहे. व्यापारी वर्गासाठी चांगला आहे. अनेक मोठ मोठ्या व्यापार्यांशी ओळख होईल. त्यामुळे उलाढालीत वृद्धी होईल. आर्थिक आवक वाढेल. गूढविद्येविषयी आकर्षण वाटेल. भावी घटनांविषयी स्वप्नाद्वारे सूचना प्राप्त होईल. साहसाकडे कल राहील. विद्याव्यासंगात भर पडेल. लोकहिताची कामे कराल. व्यापारी लोकांशी मैत्री होईल. कला व व्यापार यातून धनप्राप्तीचा वेग वाढेल. सप्तमात राहू आहे. पत्नीच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. अपघातापासून सावध रहा. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. वैधमार्गाने धनप्राप्तीचे योग. प्रवासातून लाभ होतील.
स्त्रियांसाठी -द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजार पाजारच्या सखी हेवा करतील. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.
विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान आणि कला या दोन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळा. मित्रमंडळी सिमीत ठेवा. खेळाकडे दुर्लक्ष करा. प्र्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.
शुभ तारखा – 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30