Monday, November 25, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - वृषभ - Quarterly future - Taurus

त्रैमासिक भविष्य – वृषभ – Quarterly future – Taurus

सौ. वंदना अनिल दिवाणे

सप्टेंबर – 2020

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी राहू, तृतीयात शुक्र , चतुर्थात रवि, पंचमात बुध, अष्टमात केतू-गुरू-नवमात शनि दशमात नेपच्यून व्ययात मंगळ- हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे इ,द, ए,ओ,वा,वी, वू, वे, वो अशी आहेत. राशीचे चिन्ह बैल आहे. स्वामी शुक्र, रास- पृथ्वी तत्त्वाची असल्याने सहनशक्ती चांगली. राशी स्वरूप स्थिर. काहीसा आळशी. स्वामी- शुक्र, दक्षिण दिशा फायद्याची. लिंग स्त्री असल्याने स्वभाव लाघवी. रजोगुणी. वर्ण वैश्य. राशीचा अंमल मुखावर आहे. वाचा स्पष्ट शुद्ध व प्रभवी अभ्यासाने वक्तृत्त्वकला साध्य होऊ शकेल. शुभ रत्न – हिरा, रंग- हिरवा, पांढरा. देवता- लक्ष्मीव संतोषी माता. शुभ अंक- 6, शुभ तारीख – 6, 15, 24, मित्र राशी – मकर व कुंभ. शत्रु राशी- सिंह, धनु, मीन. चिकाटी व निश्चयी. कष्टाळू, स्वभाव तेजस्वी, बुद्धीमान. पंचमात बुध आहे.. परिस्थितीत एकदम बदल होईल. पुत्र सुख उत्तम मिळेल. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. उपासनेत मत लागेल. त्यामुळे मानसिक शांती प्रदान होईल. लेखकवर्गाला साहित्यसेवा करण्यात यश मिळेल. गूढशास्त्राची आवड वाटेल. आर्थिक आवक वाढेल. धनसंग्रह करणे जमेल. राजकारणी लोकांना राजसत्तेचा भाग मिळेल. प्रतिष्ठेचे पद प्राप्त होईल..

स्त्रियांसाठी -तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळा. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करा. प्र्रकृतीची काळजी घ्या. शुभ तारखा – 2, 3, 4, 6, 7, 10, 13, 14, 18, 24, 25, 26, 28, 29, 30.

ऑक्टोबर – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी राहू चतुर्थात शुक्र, , पंचमात रवि, षष्ठात बुध, सप्तमात केतू, अष्टमात केतू-गुरू-प्लुटो, नवमात शनी, दशमात शनी, लाभात नेपच्यून व्ययात मंगळ- हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. आपल्या कार्यात प्राविण्य संपादन कराल. आकर्षक व मधुर बोलण्यामुळे घरात व घराबाहेर खेळीमेळीचे वातावरण राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. वाहनसुख मिळेल. नवीन वाहन खरेदीचा विचार करत असाल तर हा महिना चांगला आहे.

लग्नी राहू आहे. स्वतःच्या कुलाचा अभिमान वाटेल. पण महाभारतात कर्णाने जन्म कोणत्या कुळात घ्यायचा हे ईश्वराच्या हातात असले तरी त्याची खरी किंमत त्याच्या पराक्रमावर अवलंबून असते. हे लक्षात घेऊन कुळाच्या अभिमानाला स्वपराक्रमाची जोड देणे अधिक लाभदायक ठरेल. नातेवाईकांशी फारसे पटणार नाही.

स्त्रियांसाठी -चतुर्थात शुक्र आहे. महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील हे मात्र धोक्याचे आहे. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थीदशा हा जन्मभर चालवण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 2, 4, 9, 10, 11, 13, 17, 19, 21, 22, 24, 25, 26, 28, 29, 31

नोव्हेंबर- 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी राहू,पंचमात शुक्र,षष्ठात रवि-बुध, सप्तमात केतू, अष्टमात गुरू-प्लुटो, नवमात शनी , दशमात नेपच्यून, लाभात मंगळ व्ययात हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशात मंगळ आहे. सांपत्तिक लाभ होतील.त्यासाठी मित्रांचे सहकार्य लाभेल. मात्र मित्रांची पारख आवश्यक आहे. कारण त्यापैकी काही लबाड, ढोंगी, असण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याची आवड वाटेल. वाईट संगतीत राहील्यास भांडणाचे वारंवार प्रकार संभवतात. स्थावर इस्टेटीसंबंधी लाभ होण्याचा संभव आहे.

अष्टमात गुरु आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. पचनक्रियेसंबंधी किंवा इतर आजार संभवतात. मात्र गंभीर धोका नाही. कमी श्रमात अधिक धनप्राप्तीचे योग. मृत धनप्राप्तीचे योग आहेत. पण याच्या पाठीमागे लागू नये. अन्यथा असा लाभ मिळता मिळता राहून जाईल. ढोंगी लोकांच्या नादी लागू नये.

स्त्रियांसाठी -पंचमात शुक्र आहे. धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी – शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकरी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र चांगले अभ्यासू असतील.

शुभ तारखा – 4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या