प्रफुुुल्ल कुलकर्णी – ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड
8888747274
स्मृती इराणी यांचा जन्म 23 मार्च 1976 रोजी झाला, त्यांच्या आई बंगाली व वडील महाराष्ट्रीयन पंजाबी श्री अजय कुमार मल्होत्रा. स्मृती यांचे आजोबा आर एस एस चे स्वयंसेवक होते व आई जनसंघाची सदस्य होते. स्मृती यांचे शिक्षण दिल्लीतच झाले, तीन बहिणीमध्ये स्मृती सर्वात मोठी.
1998 च्या मिस इंडिया स्पर्धेत स्मृतीने भाग घेतला होता परंतु अंतिम स्पर्धेपर्यंत त्या पोहचू शकल्या नाहीत. मिल्का सिंग याने तयार केलेल्या सावनमे लागी आग रे या गाण्याने व त्यांची छोट्या पडद्यावर अतिश नावाच्या स्टार प्लस वाहिनी वरच्या मालिकेद्वारे पदार्पण झाले.
एकता कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली प्रसारित झालेल्या क्योंकी सास भी कभी बहू थी या दूरचित्रवाणी मालिकेने त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. या मालिकेतील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले, त्यांना भारतीय चित्रवाणीचा बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळाले. 2007 साली स्मृती यांनी सांस भी कभी मालिका सोडली, पुढे त्यांनी दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली काही मालिकांमधून त्यांनी अभिनय पण केला.
स्मृती यांनी 2003 मध्ये बी.जे. पी. सक्रिय सदस्य झाल्या, 2004 साली कपिल सिब्बल यांच्या विरोधात लोक- सभेची निवडणूक त्या हरल्या, त्याच सुमारास त्यांची राष्ट्रीय कार्यकारणीत निवड झाली. लोकसभेतील निवडणूक हरल्याचे खापर त्यांनी तात्कालिन गुजराथचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्यावर फोडले होते.
यांची 2010 साली बी.जे.पी.च्या राष्ट्रीय महिला विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली, 2011 मध्ये त्या गुजराथच्या राज्यसभेवर नियुक्त झाल्या. 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या विरोधात मोठे आव्हान निर्माण केले होते. मोदी सरकार परत सत्तेवर आल्यावर त्यांची महिला व बाल कल्याण आणि टेक्सटाईल कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली.
स्मृती इराणी यांच्या दोनही हातांचे हस्तसामुद्रिकदृष्ट्या विवेचन
उजवा हात –
डाव्या हातापेक्षा उजव्या कर्माच्या हातावरील रेषा व ग्रह स्थिती अत्यंत भाग्यकारक आहे. कुठलेही अशुभ चिन्हे व हातावर आडव्या तिडव्या रेषा नाहीत. आयुष्य रेषा दोन आहेत.
मस्तक रेषा स्वतंत्र आहे त्यामुळे उपजत हुशारी, निर्णय क्षमता व स्वतःच्या मन व बुद्धीप्रमाणे वागणारे असतात, त्यांना इतरांचे पटेलच असे नाही ,त्या स्वयंनिर्णय घेत असतात.
उजव्या हातावरील बोटे डाव्या हातापेक्षा रुंद आहेत, हाताच्या अकरापेक्षा छोटी आहेत व बोटांच्या टोकांकडे डाव्या हातपेक्षा निमुळती नाहीत या सर्व बाबींमुळे जलद निर्णय क्षमता मात्र विचारअंती घेतलेले निर्णय ठोस असतात.
पहिल्या पेरांच्या बोटावर फुगीर भाग आहे त्यामुळे अशा व्यक्ती अत्यंत भावनिक व संवेदनशील असतात. गुरु उंचवटयाचा उभार जास्त मोठा असल्याने अहं ब्रह्मासि वृत्ती येते कोणी सांगितलेले सहजी पचनी पडत नाही.
हातावरील मंगळ उंचवट्यांचा उभार मोठा असल्याने जिद्दीने काम करतात, डगमगत नाहीत, आव्हाने स्वीकारतात.आयुष्य रेषेतून भाग्य व रवी रेषेचा उगम झाल्याने असे लोक अत्यंत भाग्यवान असतात.
भाग्य रेषेच्यावर रवी रेषेचा उगम ह्या गोष्टीमुळे मान सन्मान प्रसिद्धी खुप मोठ्या प्रमाणावर मिळते.भाग्य घेऊन जन्माला आलेल्या हातावरील ग्रह रेषा ह्या थोड्याश्या प्रयत्नाला साथ देणार्या आहेत त्यामुळे थोड्या प्रयत्नातही उत्तुंग यश लाभते.
डावा हात –
डाव्या हातावरील गुरु, शनी,रवी बुध, मंगळ व शुक्र ग्रह अत्यंत शुभ स्थानी आहेत. चंद्र ग्रह हातावर मनगटाकडे फुगीर झाला आहे, अश्या परिस्थितीत व्यक्तीच्या अंगी अत्यंत हुशारी असते.
गुरु ग्रहाचे बोट बलवान आहे तसेच सर्व बोटे हे टोकाकडे निमुळते होत गेले आहे आहे, त्यामुळे उपजत कलागुण त्यामधे अभिनयाचे कौशल्य दिसून येते. करंगळी स्वतंत्र असल्याने स्वतःचे निर्णय स्वतःच घेणारी आहे. अंगठ्याचे दोन्ही पेरे उत्तम आहेत त्यात पहिले पेर विचार व कल्पनाशक्ती देते व दुसरे पेर त्या कल्पनेवर अंमलबजाणी करते दोन्ही पेरे उत्तम आहेत.
हातावर बुध रेषा आहे, बुध रेषा हुशारी, चतुराई व निर्णयक्षमता देते. मस्तक रेषा सरळ वरच्या मंगल उंचवट्यावर गेल्याने व्यावहारिक हुशारी देते. भाग्य रेषा शुभ स्थानी आहे, तसेच आयुष्य रेषा जोमदार असल्याने शारिरिक क्षमता आरोग्य संपन्न आहे.
डाव्या हातावर कुठलेलंही अशुभ संकेत नाहीत आडव्या तिडव्या रेषा व अशुभ चिन्हे नाहीत त्या मुळे संचितातच भाग्य मेहेरबान आहे. या संचिताला कर्माच्या प्रयत्नांची जोड मिळाल्यामुळे यशाची प्राप्ती होते.